तालिबानी राजवटीत लाखो अफगाण मुले उपासमारीने त्रस्त: युनिसेफ रिपोर्ट

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाण नागरिकांना मदत करणाऱ्या अंतरराष्ट्रीय संस्थावर देश सोडण्याची वेळ आली आहे.
 Afghanistan Children
Afghanistan ChildrenDainik Gomantak

तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) त्यांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक मैदानात उतरले आहेत. यातच आता युनिसेफने इशारा दिला आहे की, अफगाणिस्तानातील लाखो मुलांना मानवीय मदतीची नितांत गरज आहे. युनिसेफने (UNICEF) आपल्या अहवालात म्हटले आहे की, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाण नागरिकांना मदत करणाऱ्या अंतरराष्ट्रीय संस्थावर देश सोडण्याची वेळ आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे ही मुले आधीच मानवतावादी आणि परदेशी मदतीवर अवलंबून होती. तालिबानचे अफगाणिस्तानात सरकार स्थापन झाल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशात अन्न आणि पाण्याच्या मूलभूत गरजा सुध्दा उपलब्ध होत नसल्याने अनेक लोक उपासमारीचे बळी ठरत आहेत. देशाची मोठी लोकसंख्या उपासमारीमुळे त्रस्त आहेत. विशेषतः देशातील मुलांची स्थिती दयनीय झाली आहे. सध्या अफगाणिस्तानात मानवतावादाचं मोठं संकट उभा राहिलं आहे. यातच युनिसेफचा आलेला अहवाल धक्का देणारा आहे.

10 लाख मुले उपासमारीला बळी पडू शकतात

युनिसेफच्या अहवालातून धक्कादायक दावा करण्यात आला आहे की, या वर्षी 10 लाखांहून अधिक मुले उपासमारीची शिकार होऊ शकतात. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीच्या अनागोंदी कारभाराचा फटका अफगाण मुलांना बसत आहे. या वर्षी सुमारे 10 लाख मुले कुपोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही मुले अन्न आणि उपचारामुळे मरुही शकतात.

दरम्यान एका अंदाजानुसार, सुमारे 42 लाख मुले शाळेबाहेर आहेत. यामध्ये सुमारे 22 लाख मुलींचा सहभाग आहे. डब्ल्यूपीएफच्या (WPF) आकडेवारीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सुमारे 20 लाख मुले कुपोषित आहेत. ही बाब युद्धपातळीवर सोडवली गेली नाही तर त्याचे गंभीर मानवीय संकट निर्माण होऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय संस्थांचे म्हणणे आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस लाखो लहान मुलांना कुपोषणाचा सामना करावा लागू शकतो. अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात गेल्या सहा महिन्यांत कुपोषणामुळे 17 मुलांचा मृत्यू झाला आहे.

 Afghanistan Children
Talibanचा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत मोठा निर्णय

युनिसेफचे कार्यकारी संचालक हेन्रीएटा फोर (Henrietta Four) म्हणतात की, आम्ही तालिबान आणि इतर पक्षांना युनिसेफ आणि आमच्या भागीदारांना गरजू मुलांपर्यंत पोहचण्यासाठी संरक्षण प्रदान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो. देशात मूलभूत गरजांची मोठी वणवा आहे. अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले की, आम्हाला अंदाज आहे की, येत्या काही महिन्यांत देशात भीषण दुष्काळ पडू शकतो. त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. हिवाळा सुरु झाल्यावर मुले आणि महिलांच्या मानवी गरजा वाढतील.

 Afghanistan Children
अशरफ घनींसोबत 'हा' क्रिकेटपटू सुद्धा अफगाणिस्तान सोडून पळाला

अफगाणिस्तानात 14 दशलक्ष लोकांसमोर भाकरीचे संकट निर्माण झाले आहे. द वर्ल्ड फूड प्रोग्राम ऑफिस असेही म्हणते की, अफगाणिस्तानची लोकसंख्या 30.9 दशलक्ष आहे. यामध्ये 14 कोटी लोकांसमोर गंभीर अन्न संकट निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानात तीन वर्षांत दुसऱ्यांदा भीषण दुष्काळाला सामोरे जात आहे, ज्यामुळे देशाची परिस्थिती बिकट होत आहे. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर देशाला मिळत असलेली परदेशी मदत बंद केली. तालिबानची राजवट अफगाणिस्तानात स्थापन झाल्यानंतर जागतिक बँकेने अफगाणिस्तानला मिळणारा कोट्यवधींचा निधी थांबवला आहे. 2002 पासून जागतिक बँकेने अफगाणिस्तानमध्ये सुमारे 5.3 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. अफगाणिस्तानमध्ये जागतिक बँकेचे 27 प्रकल्प चालू आहेत. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तालिबानला मदत देण्यास नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com