मॉर्डर्ना लस 12 वर्षाच्या मुलांवरही असरदार; जागतिक लसीकरणाला वेग

Moderna vaccine
Moderna vaccine

मोडेर्नाने  (Moderna)  मंगळवारी दावा केला की त्यामची अँटी कोविड -19 ही लस प्रौढ तसेच 12 वर्षांच्या मुलांवर देखिल प्रभावी आहे. यासह, ही लस या वयोगटातील अमेरिकेतील (America) लसीचा दुसरा पर्याय बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक लसींचा पुरवठा (Vaccine Supply) अजूनही कमी आहे आणि जगातील बहुतेक देशांमध्ये साथीच्या रोगाच्या शल्यक्रियासाठी प्रौढांना लसीकरणासाठी संघर्ष करावा लागला आहे.(Moderna vaccine affect 12 year old girl)

अमेरिकेने आणि कॅनडाने या महिन्याच्या सुरूवातीस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणारी फायझर आणि बायोटेक लसीला परवानगी दिली होती. मॉडर्ना लस सध्या परवानगीच्या रांगेत आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाला आणि इतर जागतिक नियामकांना किशोरांशी संबंधित आपला डेटा सादर करणार असल्याचे सांगितले.

प्रारंभिक निकाल चांगले
कंपनीने 12 ते 17 वर्षे वयोगटातील 3700 मुलांचा अभ्यास केला. सुरवातीच्या परिणामांवरून हे सिद्ध केले की ही लस प्रौढांप्रमाणेच पौगंडावस्थेतील मुलांची रोगप्रतिकारक शक्तीच्या संरक्षणावर कार्य करते. त्याचबरोबर या लसीमुळे हातावर सूज येणे, डोकेदुखी आणि थकवा यासारखे तात्पुरते दुष्परिणाम दिसतात. मॉडर्न लसीचे दोन डोस घेतलेल्यांमध्ये कोविड-१९ नाही  आढळला, तर डमी लस घेणाऱ्या मुलांमध्ये कोरोनाची चार प्रकरणे आढळली.

आतापर्यंत 316 मुलांचा मृत्यू झाला
कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की पहिल्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर ती 93 टक्के प्रभावी होती. प्रौढांच्या तुलनेत कोविड -19 मध्ये आजारी पडण्याचा धोका मुलांमध्ये कमी असतो, परंतु ते देशातील कोरोनाव्हायरसच्या 14% प्रकरणांमध्ये या मुलांची सख्या जास्त दिसून येते. अमेरिकन एकेडमी ऑफ पिडियाट्रिक्स आकडेवारीनुसार, केवळ अमेरिकेतच 316 मुले मरण पावली आहेत.

लसीकरण केंद्रावर किशोरवयीन मुलांची गर्दी
नियामकाकडून मान्यता मिळाल्यानंतर फाइजरच्यालसीकरण करण्यासाठी अमेरिकेत लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात किशोरवयीन मुले पोहोचत आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापूर्वी अधिकाधिक किशोरवयीन मुलांना लसी देण्याचा प्रयत्न आहे. फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही लसींच्या 11 ते 6 महिन्यापर्यंतच्या मुलांच्या चाचण्या करण्यास सुरवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com