पाकच्या संसदेत मोदींचा जयघोष

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पाकिस्तानच्या संसदेमध्ये आज चक्क मोदी- मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्याने सगळेचजण अवाक झाले होते. बलुचिस्तानच्या खासदारांनी ही घोषणाबाजी केली.

 

पाकिस्तानच्या संसदेमध्ये आज चक्क मोदी- मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्याने सगळेचजण अवाक झाले होते. बलुचिस्तानच्या खासदारांनी ही घोषणाबाजी केली. या घोषणेमुळे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा चेहरा अक्षरश ः लालबुंद झाला होता. इम्रान सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी या खासदारांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यामध्ये इम्रान सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला.

संबंधित बातम्या