अमेरिकेतील रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस, पाहा Video

ही घटना दक्षिण कॅलिफोर्निया (Southern California) महामार्गावर घडली.
पैसे उचलण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ
पैसे उचलण्यासाठी लोकांमध्ये चढाओढDainik Gomantak

अमेरिकेतील (America) एका शहरात रस्त्यावर पैशांचा पाऊस पडू लागला. त्यानंतर काय नोटा घेण्यासाठी लोकांमध्ये चेंगराचेंगरीही पाहायला मिळाली. ही घटना दक्षिण कॅलिफोर्निया (Southern California) महामार्गावर घडली. जेव्हा डॉलरने भरलेली बॅग घेऊन जाणारा ट्रकचा (Armoured truck) महामार्गावरच अपघात झाला. बॅग पडल्यानंतर त्या हिसकावण्यासाठी महामार्गावरुन जाणाऱ्या (Cash bags dropped on Highway) लोकांमध्ये डॉलर घेण्यासाठी एकच गोंधळ उडाला. संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कार्ल्सबाडमध्ये (Carlsbad) सकाळी 9.15 वाजता ही घटना घडली.

कॅलिफोर्निया हायवे (California Highway) पेट्रोल सार्जंट कॅट्रिस मार्टिन म्हणाले, "वाहनाचा एक दरवाजा उघडला तेव्हा बॅगने भरलेला पैशांची बॅग बाहेर पडल्या." या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावर पैसे घेत असताना दिसत आहेत. यावेळी रस्त्यावर विखुरलेल्या नोटाही दिसल्या. त्याचवेळी गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी महामार्गावर वाहने थांबवण्यात आली. त्यानंतर लोक आपापल्या वाहनांमधून बाहेर पडले आणि नंतर नोटा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी वाहने थांबविण्याचा निर्णय घेतला.

पैसे उचलण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ
ब्रिटनही आता तालिबानच्या पाठीशी, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे मोठे विधान

हातात नोटा असलेले लोक हसताना दिसले

कटिस मार्टिन (Cutris Martin) यांनी सांगितले की, बॅग उघडल्यामुळे प्रामुख्याने एक डॉलर आणि 20 डॉलरच्या नोटा रस्त्यावर पसरल्या, त्यामुळे या मार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये काही लोक पैसे हातात घेऊन हसताना दिसत आहेत. घटनास्थळावरुन दोन जणांना अटक करण्यात आले. दरम्यान मार्टिनने सावध केले की, पैशासह कोणीही सापडल्यास त्यावनर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यांनी पुढे सांगितले की, घटनास्थळी उपस्थित लोकांनी बरेच व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. याद्वारे सीएचपी आणि एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पैसे परत करण्याचे आवाहन करण्यात आले

त्याचवेळी, ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांना ते सीएचपी कार्यालयात परत करण्याची विनंती केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सॅन दिएगो युनियन ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे की, किती रोख रक्कम गायब झाली आहे हे अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही. मात्र किमान 12-13 जणांनी पैसे परत केले आहेत. कॅट्रिस मार्टिन यांनी सांगितले की, लोकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन पैसे परत केले आहेत. त्याने पुढे सांगितले की, जेव्हा डॉलरने भरलेली बॅग पडली तेव्हा लोकांना खूप पैसे मिळाले. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, सकाळी 11 वाजता महामार्ग पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com