मंकीपॉक्सकडे दुर्लक्ष करता येणार नाही - WHO

भारतात आतापर्यंत चार रुग्णांची नोंद
Soumya Swaminathan
Soumya SwaminathanDainik Gomantak

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो डोळे उघडायला लावणारा असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या, (Monkeypox cannot be ignored say WHO soumya swaminathan )

सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव आमच्यासाठी डोळे उघडायला लावणारा आहे. कारण या प्राणघातक प्रादुर्भावापासून सावध राहण्यासाठी स्वतःला नेहमीच तयार ठेवणे आवश्यक आहे. याची लस ही अत्यंत मर्यादित आहेत. डेन्मार्क-आधारित कंपनी बव्हेरियन नॉर्डिकने मंकीपॉक्ससाठी लस विकसित केली आहे, परंतु परिणामकारकता डेटा नाही. त्यामूळे याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही.

Soumya Swaminathan
Congo मध्ये दोन भारतीय जवान शहीद; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला शोक

मंकीपॉक्स हा कोविडच्या विषाणूपेक्षा घातक असू शकतो का ? या प्रश्नावर डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणाले की, या दोघांची थेट तुलना होऊ शकत नाही. डेटा उपलब्ध नसतानाही, हे स्पष्ट आहे की मंकीपॉक्स हा एक वेगळा विषाणू आहे आणि तो कोविड प्रमाणेच उत्परिवर्तित होणार नाही.

Soumya Swaminathan
Israel Demolished Home: दंगलखोरांचा बिमोड करण्यासाठी इस्रायलमध्ये 'योगी फॉर्म्युला'

आम्हाला डेटाच्या जागतिक शेअरिंगची गरज - WHO

"आम्हाला सिक्वेन्सिंग आणि इतर सर्व गोष्टी करण्याची गरज आहे. आम्हाला डेटाच्या जागतिक शेअरिंगची गरज आहे. आत्ता आम्हाला ते महामारी बनण्यापासून थांबवायचे आहे. "भारताबद्दल बोलायचे तर, येथे मंकीपॉक्स आहे. आतापर्यंत चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये केरळमध्ये तीन आणि दिल्लीत एक प्रकरण नोंदवले गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com