Israel: बोनफायर फेस्टिव्हलमध्ये 30 हून अधिक लोकांचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

इस्राईलमधील बोनफायर फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी अचानक चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत आणि 100 हून अधिक लोक जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

इस्राईलमधील बोनफायर फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी अचानक चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत आणि 100 हून अधिक लोक जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि ही मोठी आपत्ती आहे असं म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. माउंट मेरन स्टेडियमच्या पायऱ्यांवरून काही लोकं घसरल्याने चेंगराचेंगरी सुरू झाली. सोशल मिडियावर या गर्दीचे भयावह फोटो व्हायरल होत आहेत.

इस्त्राईलच्या राष्ट्रीय आपत्कालीन सेवा मगन डेव्हिड एडॉम (MDA) ने मृत्यूची अचूक आकडेवारी सांगितली नाही. त्यांनी असे म्हटले आहे की काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले जात आहे. मात्र इस्त्रायलच्या स्थानिक वृत्तपत्राने कमीतकमी 38 लोक ठार झाल्याची बातमी दिली आहे.

बायडन यांचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण; टेक ऑफसाठी अमेरिका सज्ज 

इस्रायलच्या मेरॉन शहरात बी-ओमर महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले होते. कोरोना महामारीचा फैलाव झाल्यापासून हा देशातील सर्वात मोठा कार्यक्रम होता. इस्त्राईल हा पहिला देश होता जो कोरोनामुक्त झाला होता. जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्यावेळी लोक पायऱ्यांवरून चालत होते तेव्हा काही लोकं पायऱ्यांवरून घसरले आणि हा अपघात झाला. यानंतर एकामागून एके लोकं एकमेकांवर पडले. दरम्यान गर्दीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात लोक चेंगराचेंगरीत चिरडल्या गेले. आणि त्यातच काही लोकांचा मृत्यू झाला तर काही लोकं गंभीर जखमी झाले आहे.
 

संबंधित बातम्या