कोरोनाच्या लठ्ठ रुग्णांना धोका अधिक! आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला दावा

 More risk to coronary obese patients! Claimed by a team of international researchers
More risk to coronary obese patients! Claimed by a team of international researchers

वॉशिंग्टन: कोरोनाच्या लठ्ठ रुग्णांना इतर सामान्य रुग्णांपेक्षा मृत्यूचा ४८ टक्के अधिक धोका आहे. त्याचप्रमाणे, त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागण्याचे प्रमाण ७४ टक्के तर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण सामान्यांपेक्षा ११३ टक्के अधिक असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या संशोधकांनी जगभरातील ३० पेक्षा अधिक बीएमआय असणाऱ्या रुग्णांवर केलेल्या ७५ संशोधनाचा अभ्यास केला. यात जवळपास चार लाख रुग्णांची माहिती जमा करण्यात आली होती.  लठ्ठ व्यक्तींना केवळ कोरोनाचाच नव्हे तर इतर सर्व प्रकारचे संसर्ग व आजारांचाही अधिक धोका आहे. आपल्या शरीरावर कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूने हल्ला केल्यावर शरीर त्याला जळजळण्याच्या माध्यमातून पहिला प्रतिसाद देते. मात्र, शरीरातील चरबीयुक्त पेशी प्रतिकारशक्तीची दिशाभूल करतात.

लठ्ठ व्यक्तींच्या शरीरातील या अतिरिक्त चरबीयुक्त पेशी नेहमीच शरीराला विषाणूसारख्या बाह्य आक्रमणाची खोटी बातमी देतात. त्यामुळे, शरीराच्या प्रतिकारशक्तीला प्रत्येक क्षणी सावध राहावे लागते. त्यातून, विषाणूचा खरा हल्ला झालेला नसतानाही प्रतिकारशक्तीला सुसज्ज राहते. यातूनच लठ्ठ व्यक्तींना सतत जळजळ होण्याचा त्रासही होतो. थोडक्यात, लठ्ठपणा प्रतिकारशक्तीला अधिक ताण देतो. त्यातून, प्रतिकारशक्ती कमकुवत होते व गंभीर आजारांचा धोका वाढतो.

लठ्ठपणा समजून घ्या
केवळ वजन म्हणजे लठ्ठपणा नव्हे तर बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) प्रमाणापेक्षा अधिक असणे म्हणजे लठ्ठपणा होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार ३० पेक्षा अधिक बीएमआय म्हणजे लठ्ठपणाची पहिली पातळी, ३५ पेक्षा अधिक असल्यास गंभीर लठ्ठपणा व तो ४० पेक्षा अधिक असल्यास अधिक गंभीर लठ्ठपणा समजला जातो.

तज्ज्ञांची मदत घ्या
लठ्ठपणावर सहजसोपा उपाय म्हणून आहार मर्यादित करून व्यायाम वाढविण्यास सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात लठ्ठपणा हा गुंतागुंतीचा आणि बहुआयामी आजार असल्याने तज्ज्ञांची मदत गरजेची ठरते. त्यामुळे, तुम्ही जीवनशैलीत सुधारणा, व्यायाम, आहाराचे पालन करूनही फारसे वजन कमी करू शकला नसाल तर तज्ज्ञांची मदत घ्या, असे संशोधकांचे मत आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com