जिन्नांची निशाणी इम्रान सरकार ठेवणार गहाण ?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

पाकिस्तानी जनतेला नया पाकिस्तानची स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेले इम्रान खान यांच्या काळात पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानी जनतेला नया पाकिस्तानची स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेले इम्रान खान यांच्या काळात पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या आर्थिक संकटामुळे पाकिस्तानच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. पैसा उभारण्यासाठी इम्रान खान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशाची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मोहम्मद अली जीना अर्थात कायदे आझम यांच्या निशाणी गहाण ठेवण्याचा निर्णय इम्रान खान घेतला आहे. सरकारला 500 अब्ज रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी जीनांच्या बहिणींच्या नावाने असणारे लोकप्रिय पार्क गहाण ठेवण्याच्या विचारात इम्रान खान सरकार आहे. 

पाकिस्तानचे सर्वाधिक लोकप्रिय वृत्तपत्र असणाऱ्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 500 अब्ज रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी इस्लामाबाद मधील एफ नाईन सेक्टरमधील सर्वात मोठे पार्क गहाण ठेवण्यात येणार आहे. इस्लामाबादमध्ये जीनांच्या बहिणीच्या स्मृतीप्रित्यार्थ उभा करण्यात आलेले पार्क 759 एकरामध्ये हे पार्क पसरलेले आहे. हे पार्क स्थानिक लोकांच्या मनोरंजनासाठी वापरण्यात येते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  इम्रान खान सरकारची कॅबीनेट मंत्र्याची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाकिस्तानातील लोकप्रिय पार्कचा पाकिस्तानला आर्थिकसंकटातून  बाहेर काढण्यासाठी थोडा हातभार लागावा यासाठी हे पार्क गहाण ठेवण्यात येणार आहे. अनेक देशांकडून कर्ज घेवून पाकिस्तान अधीच कर्जबाजारी झाला आहे.

यापूर्वी पाकिस्तानने सौदी अरेबियाकडून कर्ज घेतले होते. मात्र पाकिस्तानने घेतलेल्या एका हरकतीमुळे सौदीने ते कर्जाची रक्कम परत मागवून घेतली. दरम्यान सौदीच्या कर्जाची रक्कम चीनकडून घेतलेल्या उसण्या पैशातून देवून टाकले. चीनच्या कर्जाखाली पाकिस्तान अखंड बुडाला आहे. या कर्जाच्या रकमेपायी पाकिस्तानने ग्वादार बंदर चीनला लीजवर दिले आहे. वाढत्या पाकिस्तानच्या आर्थिक मंदीमुळे चीननेही आर्थिक मदत करण्याचा हात अखडता घेतला आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले. देशातील उद्योगधंदे पूर्णपणे लयाला गेले आहेत. आता पाकिस्तानवर लोकप्रिय स्थळे गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

संबंधित बातम्या