मॉस्को सैन्याने 2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिकांना रशियात नेले, युक्रेनचा आरोप

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात निष्पाप नागरिक सतत लक्ष्य बनत आहेत.
मॉस्को सैन्याने 2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिकांना रशियात नेले, युक्रेनचा आरोप
Russia Ukraine warTwitter

Russia Ukraine war: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात निष्पाप नागरिक सतत लक्ष्य बनत आहेत. या युद्धात हजारो निष्पाप लोक मारले गेले आहेत, तर लाखो लोकांना आपली घरे सोडून इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून जगावे लागत आहे. या सगळ्यात युक्रेनने पुन्हा एकदा रशियावर मोठा आरोप केला आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की मॉस्कोच्या सैन्याने सुमारे 2 लाख मुलांना जबरदस्तीने रशियात नेले आहे. त्याच वेळी, रशियाचे म्हणणे आहे की त्यांनी मोठ्या संख्येने युक्रेनियन नागरिकांची सुटका केली आणि नंतर त्यांना रशियात आणले. (Russia Ukraine Updates)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेन थेट रशियावर आपल्या नागरिकांना जबरदस्तीने रशियात नेत असल्याचा आरोप करत आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की रशियन सैन्याने सुमारे 11 लाख लोकांना ओलिस करून रशियात नेले आहे. यामध्ये 2 लाख मुलांचा समावेश आहे.

Russia Ukraine war
पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कच्या राणींची घेतली भेट, अनेक मुद्द्यांवर केली चर्चा

रशिया यावर काय म्हणतो

त्याचवेळी रशियाने युक्रेनचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की युक्रेनमधून कोणत्याही नागरिकांना जबरदस्तीने आणले गेले नाही. आत्तापर्यंत आपल्या सैन्याने 1092137 युक्रेनियन लोकांना रशियात आणले आहे, त्यात 196356 मुले आहेत, पण ती सर्व आपल्या इच्छेने येथे आली आहेत. हे सर्व रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या डॉनबास भागातून आणण्यात आले आहेत.

3 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला

या युद्धात अनेक नागरिकांचे प्राणही गेले आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये आतापर्यंत 3153 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर युद्धात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या 3316 आहे.

Russia Ukraine war
Video: Ukraine ने उडवल्या दोन रशियन नौका, ड्रोनने केली कामगिरी

दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता युक्रेनने स्नेक आयलंडजवळ दोन रशियन नौका उदध्वस्त केल्याचं म्हटलं आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे युद्धाच्या सुरुवातीलाच रशियाने (Russia) युक्रेनियन सैन्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते आणि तेव्हा त्यांनी नकार दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.