लाजिरवाणं! नील पॅरीश यांनी ब्रिटनच्या संसदेतच पाहिले 'पॉर्न'

ब्रिटनमधून (Britain) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
लाजिरवाणं! नील पॅरीश यांनी ब्रिटनच्या संसदेतच पाहिले 'पॉर्न'
MP Neil ParishDainik Gomantak

ब्रिटनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील संसद भवनात एक ब्रिटिश खासदार नील पॅरिश पॉर्न पाहताना पकडले गेले. त्यांचे हे कृत्य एका महिलेने पाहिले. यानंतर संसद भवनात प्रचंड गदारोळ झाला. पॅरिश यांच्या या कृत्यामुळे सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षावर खूप टीका होत आहे. नील पॅरिश (MP Neil Parish) हे पीएम बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यानंतर पॅरिश यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. पॅरिश यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दोनदा पॉर्न पाहिल्याचे मान्य केले आहे. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर ते म्हणाले की, ''हा आपला वेडेपणा होता त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.'' (MP Neil Parish who was caught watching porn in the British Parliament had to resign)

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पॅरीश म्हणाले, 'मी पहिल्यांदा ट्रॅक्टरची वेबसाइट पाहत होतो. यादरम्यान अचानक पॉर्न क्लिक झाले, पण मी ते दुसऱ्यांदा जाणूनबुजून केले. अशाप्रकारे पॉर्न पाहणे योग्य नाही. मी स्वतः ते चुकीचे मानतो.' 'राजीनाम्यानंतर नील यांनी हे कृत्य करायला नको होते,' असेही सांगितले. आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे देखील ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'माझा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे मी दुसऱ्यांदा वेबसाइटवर गेलो होतो.'

MP Neil Parish
अर्मेनियाकडून युद्धविरामाचे उल्लंघन, अझरबैजानने केला दावा

तुमच्या मनात काय चालले होते असे विचारले असता त्यांनी म्हटले की, हा वेडेपणा आहे. "मी जे करत होतो त्याचा मला अभिमान वाटत नाही," ते पुढे म्हणाला की, ''आजूबाजूचे लोक ते पाहतील असा माझा हेतू नव्हता. मी जे काही केलं त्याचा मी बचाव करणार नाही. मी जे केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं.''

तसेच, महिला खासदारांनी ब्रिटीश खासदार नील पॅरिश यांना फोनवर पॉर्न पाहताना पकडले. त्याबद्दल त्यांनी निदर्शनेही केली. राजीनामा दिल्यानंतर ते थेट टीव्हीवर रडले. ते म्हणाले की, 'मी माफी मागतो.' नील पॅरिश हे ब्रिटीश कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. 2010 पासून ते सातत्याने खासदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.