मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियन्स इंडेक्सनुसार चीनच्या झोंग शनशान यांना मागे टाकत पहिले स्थान पटकवले आहे. झोंग यांच्या कंपनीला गेल्या आठवड्यात विक्रमी 20 टक्के तोटा झाला. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे 80 अब्ज डॉलर्स असून चीनचे झोंग शनशान यांची 76.6 अब्ज डॉलर्स एवढी आहे. झोंग यांनी चीनमधीलच सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती झाले होते.

श्रीलंकेचा चीनला दणका; कोरोनाची लस ठेवली 'होल्ड'वर!

गेल्या दोन वर्षापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत. मात्र झोंग शनशान यांनी आपल्या दोन कंपन्यांच्या जोरावर आशियातील श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता. 2021 सुरुवातीलाच शनशान हे जगातील सहाव्या क्रमांकाचे व्यक्ती ठरले आहेत. तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी गुगल आणि फेसबुकला तसेच इतर गुंतरवणूकदारांना रिलायन्स आणि रिटेल य़ुनिटमधील समभागांची विक्री करुन आपले वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. 
 

संबंधित बातम्या