दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान न्यायालयाने ठोठावला दहा वर्षांचा तुरूंगवास

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा (जेयूडी) या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे.​

लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा (जेयूडी) या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोन दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप होता. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज सईदचे नाव आहे. त्याच्यावर एक लाख अमेरिकी डॉलरचे इनामही जाहीर होते. दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून पाकिस्तान पोलिसांनी गेल्या वर्षी त्याला अटक केली होती. 

अधिक वाचा : 

पाकिस्तानातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल युरोपीय महासंघाच्या संसदेने व्यक्त केली चिंता 

बायडेन मंत्रिमंडळात दोन भारतीय? 

दलाई लामा निवडीचा कोणताही अधिकार चीनला नाही 

संबंधित बातम्या