चर्चमध्ये जाऊन मुस्लिम नर्संचा ख्रिश्चन नर्सवर धर्मपरिवर्तनासाठी दबाव  

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

लाहोरमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये असलेल्या एक चर्चमध्ये काही मुस्लिम परिचारिकांनी (नर्स) घुसून तिथे गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.

लाहोर : पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)  यांनी पाकिस्तानला रियासत-ए- मदिना (आपलसंख्याकांना समान हक्क)  बनविण्याचे वचन देऊनही अल्पसंख्यांक नागरिकांचा छळ खुलेआम सुरूच आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. लाहोरमध्ये मेंटल  हॉस्पिटलमध्ये असलेल्या एक चर्चमध्ये काही मुस्लिम परिचारिकांनी  (नर्स) घुसून तिथे गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. मेंटल हॉस्पिटलमधील मुस्लिम परिचरिकांनी चर्चमध्ये घुसून तिथे गोंधळ घालत  मुस्लिम धार्मिक गाण्यास सुरवात केली. चर्च अपवित्र केले.  इतकेच नव्हे तर चर्चमधील ख्रिश्चन धर्माच्या परिचरिकांनाही धमकावत त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. तसेच धर्मपरिवर्तन न केल्यास त्यांना ईशनिंदा कायद्याचा सामना करावा लागेल अशी धमकीही दिली. याशिवाय, या परिचरिकांनी हॉस्पिटलमधील इतर सर्व मुस्लिमेतर कर्मचार्‍यांना नोकर्‍यावरून काढून टाकण्याची धमकी हॉस्पिटल प्रशासनाला दिली. (Muslim nurses pressurize Christian nurses to convert) 

WHO ने 'मॉडर्ना' लसीला आपत्कालीन वापरासाठी दिली मंजूरी

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. पाकिस्तानात,ख्रिश्चन परिचारिकांविरूद्ध निंदा-हिंसाचाराचे हे तिसरे मोठे प्रकरण असल्याचेही नायला इनायत यांनी नमूद केले आहे. दरम्यान या घटनेनंतर अद्याप पाकिस्तान सरकारने या मुस्लिम परिचारिकांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तथापि, यांचा वर्षी कराची येथील एक नर्स आणि फैसलाबादमधील एका परिचारिकेविरोधात कथित ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी मुस्लिम परिचारिकांच्या या कृत्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एवढेच नव्हे तर इम्रान खान सरकारने अल्पसंख्यांकांचे हित जपण्याच्या दाव्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय संघटनांसह पाकिस्तानच्या मानवाधिकार संघटनाही अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत.  परंतु अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसत नाही.  हिंसाचाराची प्रकरणे बहुतेक वेळा हिंदूंवरच नव्हे तर ख्रिस्ती आणि अल्पसंख्याक जातींवरही झाल्याच्या अनेक घटना आढळून आल्या आहेत. याहून धक्कादायक बाब म्हणजे कधीकधी अल्पवयीन मुलींचे अपहरण करून आणि लग्न करुन धर्म बदलण्यास भाग पाडले जाते, कधीकधी इतर धार्मिक प्रार्थनास्थळांना आणि थेट घरांनाही लक्ष्य  केल्याच्या घटना याठिकाणी समोर आल्या आहेत. 

संबंधित बातम्या