जर्मनीत हिटलरी कृत्य, मुस्लिम महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणी

भारताला लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल धडा शिकवणाऱ्या जर्मनीमध्येच अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
Muslim Women
Muslim WomenDainik Gomantak

Muslim Women: भारताला लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल धडा शिकवणाऱ्या जर्मनीमध्येच अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्याचा प्रत्यय अलीकडेच एका मुस्लिम महिलेवर हल्ला झाला तेव्हा दिसून आला. बर्लिनमध्ये या महिलेबाबत हा प्रकार घडला. एवढेच नाही तर महिलेवर वांशिक टिप्पणीही करण्यात आली आणि तिचा हिजाबही फाडण्यात आला.

वास्तविक, ही घटना जर्मनीची (Germany) राजधानी बर्लिनमधील (Berlin) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका रेस्टॉरंटमध्ये हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम महिलेवर हल्ला करण्यात आला आहे, हल्लेखोराने तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी हिजाब देखील फाडला. हल्लेखोराने महिलेचा हिजाब फाडल्यानंतर तिच्या डोक्यावर वार केला.

Muslim Women
सौदी क्राउन प्रिन्स 'सनकी अन् किलर', गुप्तचर अधिकाऱ्याचा दावा

दुसरीकडे, जर्मनीमध्ये मुस्लिम (Muslim) समाजातील लोकांचा छळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यातच आता बर्लिनमध्ये मुस्लिम महिलांवर वांशिक टिपण्णीचे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने दोन महिलांवर वांशिक टिप्पणी केल्यानंतर हा प्रकार घडला. मात्र, त्यानंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली.

Muslim Women
क्राउन प्रिन्स सलमान यांना आपल्याच वडिलांना करायचे होते ठार ?

यापूर्वी मुहम्मद जुबेरच्या अटकेप्रकरणी जर्मनीने प्रश्न उपस्थित करत पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेसाठी त्रास देऊ नये किंवा त्यांना तुरुंगात टाकू नये, असे म्हटले होते. पत्रकार मुहम्मद जुबेर यांच्या प्रकरणाची आम्हाला माहिती आहे. इतकेच नाही तर, जर्मनीने असेही म्हटले आहे की, 'भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे अपेक्षित आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com