'फ्रेंच लोकांची हत्या करण्याचा मुस्लिमांना अधिकार'; मलेशियाच्या माजी पंंतप्रधानांचे वादग्रस्त व्टिट

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

महाथिर यांनी हे ट्वीट केले असून कित्येक लाख फ्रेंच नागरिकांचा जीव घेण्याचा अधिकार मुस्लिमांना असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, काही वेळातच त्यांना आपले ट्वीट काढून टाकावे लागले. त्यांच्या वक्तव्यावर फ्रान्सनेही आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

पॅरिस-  मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांनी कित्येक लाख फ्रेंच लोकांना ठार मारण्याचा अधिकार असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते. फ्रान्समध्ये काल एका हल्लेखोराने अल्लाहू अकबरची घोषणा करत एका चर्चवरच हल्ला चढवला होता ज्यात तीन फ्रेंच नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमधील एका महिलेची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबत महाथिर यांनी हे ट्वीट केले असून कित्येक लाख फ्रेंच नागरिकांचा जीव घेण्याचा अधिकार मुस्लिमांना असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, काही वेळातच त्यांना आपले ट्वीट काढून टाकावे लागले.

दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावर फ्रान्सनेही आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फ्रान्समधील ट्विटरच्या व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा करत महाथिर यांचे ट्विटर अकाऊंट तात्काळ निलंबित केले जावे अशी विनंती केली आहे. तसे न केल्यास ट्विटर हा हत्या करण्यासाठीच्या आवाहनात सामील असेल, असे मत फ्रान्सचे कॅड्रिक ओ यांनी म्हटले आहे.        
  मलेशियाचे माजी पंतप्रधान बोलताना म्हणाले होते की, फ्रान्सच्या इतिहासाचा अभ्यास केला तर त्यांनीही   आजतागायत लाखो लोक मारली आहेत. यात बहुतांशी लोक मुस्लिमच होते. फ्रान्सने घडवलेला रक्तपात पाहता मुस्लिम लोक राग व्यक्त करत असतील आणि माणसे मारत असतील तर त्यांना त्याचा पूर्ण हक्क आहे. 

हा वाद मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रावरून सुरू झाला होता. यानंतर फ्रान्सच्या एका चर्चमध्ये चाकू हल्ला करण्यात आला होता. यामध्ये तीन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. फ्रान्सच्या नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली होती
 

संबंधित बातम्या