म्यानमारच्या नेत्या आंग सांग सू की लष्कराच्या ताब्यात; लष्कराकडून आणीबाणी लागू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

म्यानमारच्या लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी लागू करत, देशाचा ताबा घेतला आहे.

नेपीताव : म्यानमारच्या लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी लागू करत, देशाचा ताबा घेतला आहे. लष्कराच्या मालकीच्या मायवाड्डी टीव्हीवरील  एका घोषणाकर्त्याने आज सकाळी ही घोषणा केली. या घोषणेनंतर लष्कराच्या उठाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.इर्रावड्डी  या प्रस्थापित ऑनलाइन वृत्तसेवाने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सर्वोच्च नेता असलेल्या आंग सॅन सू की सू ची आणि देशाचे अध्यक्ष विन मायंट यांना आज पहाटेच्या आधी ताब्यात घेतलं आहे. लष्कराकडून उपराष्ट्रपती आणि माजी जनरल मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सत्तारूढ अलेल्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य, खासदार आणि प्रादेशिक कॅबिनेट सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

डब्ल्यूएचओच्या पथका कडून हुबेईतील सी फूड मार्केटला भेट; इथूनच झाला होता

सोमवारी पहाटे म्यानमारमध्ये लष्करी कारवाई सुरू होत, सर्वोच्च नेत्या आंग सॅन सू की यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. म्यानमारची राजधानी असलेल्या नेपीताव येथील  फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीनंतर म्यानमारचे खासदार संसदेत पहिल्या अधिवेशनासाठी राजधानी नेपीताव येथे सोमवारी उपस्थित राहणार होते. सैन्याने अलिकडच्या दिवसांमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे देशांतर्गत तणाव वाढत होता आणि मोठ्या संख्येने सत्ता विस्थापनाचा धोका निर्माण झाला होता. या सत्तांतरामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांनी चिंता व्यक्त करत, म्यानमारच्या सैन्यास कायद्याच्या राजवटीचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

चीनने ‘या’ कारणासाठी दिला माजी बॅंकरला मृत्यूदंड

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन सासाकी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बर्माच्या लष्कराने देशातील लोकशाही संक्रमण बिघडवण्यासाठी काही पावले उचलली आहेत, हे वृत्त धक्कादायक आहे. अलिकडच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी किंवा बर्माच्या  लोकशाही संक्रमणाला अडथळा आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला अमेरिका विरोध करेल आणि बर्मामधील परिस्थिची पूर्ववत न केल्यास, दोषींवर कारवाई करण्यात येईल”.बर्मा हे म्यानमारचे पूर्वीचे नाव आहे.

 

संबंधित बातम्या