म्यानमार लष्कराचे हवाई हल्ले; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची थायलंडकडे धाव

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

म्यानमार लष्कराच्या हवाई हल्यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला आहे, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

गेल्या काही महिन्यामध्ये म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर शांततेत निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर म्यानमार लष्कराच्या जवानांनी हल्ला केला असून एका दिवसात 144 हून अधिक जणांना ठार केले आहे. त्यामुळे शनिवार हा म्यानमारमधील रक्तरंजित दिवस ठरला. लष्कराच्या राजवटीला विरोध करणाऱ्या आणि अधिक स्वायत्तता मागणाऱ्या कारेन गावातील बंडानंतर झालेल्या हवाई हल्ल्यात या गावामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने शेजारी असणाऱ्या थायलंडकडे धाव घेतली. त्यामुळे थायलंडने खबरदारी घेत सीमेवरील बंदोबस्त कडक केला आहे. म्यानमार लष्कारांनी मानवीय सहायता क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था फ्री बर्मा रेंजर्स संस्थेच्यानुसार, रविवारी म्यानमार लष्करांनी हवाई हल्ले केले.

म्यानमार लष्कराच्या हवाई हल्यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला आहे, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओछा यांनी म्हटले की, ''पश्चिमी सीमेवरील समस्येची माहिती आहे. थायलंड सरकार मोठ्या संख्येने थायलंडमध्ये येणाऱ्या लोकांच्या विषयी तयारी करत आहे. याशिवाय आम्ही आमच्या देशाच्या सीमाक्षेत्रात सामूहिक प्रवासास मान्यता देत नाही, परंतु मानवाधिकारांविषयी चिंता आहे. यापूर्वीही म्यानमार नागरिकांनी विस्थापीत म्हणून थायलंडमध्ये आश्रय घेतला आहे.'' (Myanmar military airstrikes Citizens rush to Thailand to save lives)

चीनची कोरोना लस घेऊनसुद्धा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोरोना बाधित

यापूर्वी आलेल्या म्यानमारमधील शरणार्थीविषयी विचारण्यात आल्यानंतर प्रयुत यांनी सांगितले की, ''आम्ही काही बाबतीत तयारी केली आहे. मात्र शरणार्थी कॅम्पच्या बाबतीत अद्याप आम्ही काही नाही सांगू शकत. आम्ही त्या विचारापर्यंत पोहचलेलो नाही.'' बर्मा रेंजर्स फ्री या संस्थेच्या मते, दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सोबत 2000 पेक्षा अधिक नागरिकांनी सालवीन नदी पार करुन उत्तर थायलंडच्या माए होंग सोन प्रांतात प्रवेश केला आहे. संस्थेच्या मतानुसार, म्यानमारमधील करेन राज्यातील तब्बल दहा हजारपेक्षा अधिक लोकांनी विस्थापन केले आहे. एका दिवसांपूर्वीच म्यानमार लष्कारांनी अंत्य़विधीसाठी जमलेल्या नागरिकांवर अमानुषपणे गोळीबार केला.

म्यानमारमध्ये लष्करांनी चालवलेल्या अमानुष अत्याचाराबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले की, ‘’देशभरात सैन्य दलाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारल्याचे कृत्य खरचं निंदनीय आहे, आज झालेली अनावश्यक हानी भयानक आहे.’’

1 फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या सैन्यांने नागरी सरकार उलथवून टाकले आणि राज्य सल्लागार आंग सॅन सू की यांच्यासह देशातील नागरी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यासोबतच त्यांनी वर्षभरासाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केली. ‘’गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शांततामय निदर्शकांना म्यानमारच्या लष्करांच्या तीव्र कारवाईला समोरे जावे लागले. या घटनेवर तोडगा काढणे आवश्यक बनले आहे,’’ असे युएनचे सरचिटणीस फरहान हक यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले.
 

संबंधित बातम्या