नासाला हवीत चंद्रावरील खनिजे

NASA wants to buy moon dirt sample from private companies
NASA wants to buy moon dirt sample from private companies

वॉशिंग्टन:  अमेरिकेची प्रसिद्ध नासा संस्था आता चंद्रावरची माती, दगड आणि अन्य खनिज पदार्थ खरेदी करण्याच्या विचारात आहे. या कामासाठी नासा चंद्रावर उत्खनन करू इच्छिणाऱ्या कंपन्यांचा शोध घेत आहे. या संदर्भात लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. या जागतिक निविदा जगभरातील कोणतीही संशोधन संस्था भरू शकणार आहे.
 
या मोहिमेच्या माध्यमातून नासा आकाशगंगाबाबत उत्खननास कायद्याचे रूप देऊ इच्छित आहे. अर्थात या मोहिमेवर जाणाऱ्या कंपनीला स्वत:च खर्च करावा लागणार आहे. तेथून माती किंवा दगडाचे नमुने एकत्र करायचे आहेत. या मोहिमेला नासा कायदेशीर रुप देऊ इच्छित आहे,  जेणेकरून भविष्यात चंद्रावरून बर्फ, हीलियम किंवा अन्य खनिज पदार्थाचे उत्खनन करण्याचा अधिकार मिळेल. दुसरीकडे भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी नासा स्थानिक साधनांचा, साहित्यांचा वापर करु इच्छित आहे. नासाचे प्रशासकीय अधिकारी जिम बायडेनस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रावरच्या उत्खनन मोहिमेसाठी बजेट निश्‍चित झालेले नाही. मात्र स्पर्धेच्या आधारावर रक्कम निश्‍चित केली जाईल. चंद्रावरच्या उत्खननासाठी नासाच्या प्रस्तावित निविदांसाठी सहा कंपन्या इच्छुक आहेत. यात टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची स्पेस एक्सप्लारेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन आणि ॲस्ट्रोबायोटिक्स टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. 

उत्खननाचा उल्लेख नाही
संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार, कोणताही देश सैन्य किंवा आण्विक हेतूने अंतराळात मोहीम करू शकत नाही. त्याचबरोबर अंतराळावरच्या कोणत्याही भागांवर कोणत्याही देशाचा दावा नाही. शांततापूर्ण उद्देशासाठी अंतराळ मोहिमांना परवानगी दिली जाते. अर्थात, या करारात उत्खननाचा उल्लेख नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com