राजेशाही परत आणून देशाला हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी नेपाळमध्ये निदर्शनेे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

नेपाळमधील उजव्या विचारसरणीची असलेल्या राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी, राजेशाही गट आणि राजेशाही समर्थक नागरिक राजेशाही आणि हिंदू राज्य पुन्हा आणण्याची मागणी करत  निदर्शने केली.

काठमांडू - नेपाळमधील उजव्या विचारसरणीची असलेल्या राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी, राजेशाही गट आणि राजेशाही समर्थक नागरिक राजेशाही आणि हिंदू राज्य पुन्हा आणण्याची मागणी करत  निदर्शने केली. शुक्रवारी दक्षिणेकडील हेटौडा शहरातून आरपीपी नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही अणण्यासाठी हे आंदोलन केले असून, ढापा आणि राजधानी काठमांडू येथे दक्षिणेकडील शहरांमध्येदेखील मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नेपाळमधील राजेशाही २००८ मध्ये  संपुष्टात आली होती पण नेपाळमधील अनेक लोकांचा कल अजूनही राजेशाहीच्या बाजूने आहे. 

 

बुधवारी, नेपाळच्या गृह मंत्रालयाने ७ प्रांतातील ७७ जिल्ह्यांना राजेशाहीसाठी केली जाणारी निदर्शने रोखण्यासाठी एक निवेदन पाठविले होते. या निर्देशानंतरही आरपीपी निदर्शने करण्यावर ठाम राहीले.  आरपीपी युवा संघटना बागमतीचे अध्यक्ष दामोदर वागळे यांनी सांगितले की, "आम्ही राजघराण्यांना पाठिंबा देत आहोत आणि गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतरही आमची चळवळ सुरूच आहे. जर त्यांनी शक्ती वापरली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ."

कोरोना साथीच्या काळात, सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या कमकुवत कामगिरीमुळे अधिकाधिक गट आणि राजेशाही समर्थक या निदर्शनास पाठिंबा देऊन नेपाळला पुन्हा हिंदू राज्य बनवण्याची मागणी करतात. सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता नाही कारण कुरघोडी आणि भ्रष्टाचारांमुळे कमी झाली आहे.
 

संबंधित बातम्या