अमेरिकेच्या निवडणूकीतही नवरात्री; जो बायनेड आणि कमला हॅरिस यांनी दिल्या शुभेच्छा

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

यंदाच्या निवणूकीतही भारतीय मतदारांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिका आणि जगभरातील हिंदूंना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यास विसरले नाही. 

वाशिंग्टन- अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील निवडणूक प्रचारात दिवसेंदिवस रंगत येत आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कोणीच कसर सोडतांना दिसत नाही. यावेळी डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. यंदाच्या निवणूकीतही भारतीय मतदारांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिका आणि जगभरातील हिंदूंना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यास विसरले नाही. 

तर कमला हॅरिस यांनीही ट्वीट करून हिंदू-अमेरिकन मित्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, हा उत्सव आपल्या सर्वांच्या उत्कर्षासाठी आणि न्याय व निष्पक्ष अमेरिकेच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी असावा.

दरम्यान राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या प्रचारादरम्यान जो बायनेड आणि रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील डिबेट कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एक टाऊन हॉल इव्हेंट आयोजित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या तुलनेत सर्वाधिक लोकांनी बायनेड यांचा कार्यक्रम पाहणे पसंत केले.

संबंधित बातम्या