तब्बल 1.47 लाखांहून अधिक मुलांनी गमावले पालक, NCPCR ची आकडेवारी जाहीर

पहिल्या स्थानी ओडिशा - 24,405 तर महाराष्ट्र - 19,623 दुसऱ्या स्थानी.नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने सर्वोच्च न्यायालयात आकडेवारी जाहीर.
NCPCR files report on orphans in Supreme Court
NCPCR files report on orphans in Supreme CourtDainik Gomantak

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने सर्वोच्च न्यायालयात अहवाल दिला (NCPCR files report on orphans in Supreme Court), ही माहिती देताना आयोगाने आकडेवारी जाहीर केली. यात म्हटले आहे की,एप्रिल 2020 पासून सुमारे 1,47,492 मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत. आयोगाच्या आकडेवारीनुसार, कोरोना (Covid19) महामारीमुळे किंवा इतर कारणाने मुलांनी त्यांची आई किंवा आई-वडील दोघेही गमावले आहेत.

NCPCR files report on orphans in Supreme Court
जपानमध्ये त्सुनामी, 3 फुटांपर्यंत उसळू शकतात लाटा

NCPCR नुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांची आकडेवारी 11 जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या त्यांच्या 'बाल स्वराज पोर्टल-COVID केअर' डेटावर आधारित आहे. आयोगाने कोविड-19 महामारीदरम्यान पालकांच्या मृत्युमुळे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या संदर्भात ही आकडेवारी जाहीर केली आहे.

अधिवक्ता स्वरूपमा चतुर्वेदी यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 'बाल स्वराज पोर्टल-कोविड केअर' वर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी अपलोड केलेल्या डेटामध्ये दोन्ही श्रेणीतील मुलांचा समावेश आहे. ज्यामध्ये मुलाने कोविड-19 संसर्गामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आई-वडील किंवा दोघेही गमावले आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार, 11 जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण अनाथ मुले 10,094 आहे,आई किंवा वडील किंवा दोघेही गमावलेली मुले 1,36,910 आहेत तर हक्क नसलेली एकूण 488 मुले आहेत.

ओडिशा राज्यातील मुलांवर सर्वाधिक परिणाम

एप्रिल 2020 पासून कोविड आणि इतर कारणांमुळे ज्या मुलांनी आपले आई किंवा वडील किंवा दोन्ही गमावले आहेत त्यांचा राज्यानुसार तपशील देतांना आयोगाने सांगितले की,दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची सर्वाधिक संख्या खालीलप्रमाणे आहे.

राज्यासह आकडेवारी

ओडिशा - 24,405

महाराष्ट्र - 19,623

गुजरात - 14,770

तामिळनाडू - 11,014

उत्तर प्रदेश - 9,247

आंध्र प्रदेश - 8,760

मध्य प्रदेश- 7,340

पश्चिम बंगाल- 6,835

दिल्ली - 6,629

राजस्थान- 6,827

मुलांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न

साथीच्या रोगाचा लहान मुलांवर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्रीपूर्वक पावले आयोग उचलत आहेत. तसेच या संदर्भात आयोगाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सांगितले की, NCPCR बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रत्येक कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या बाबतीत अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या आयोगांसोबत बैठका आयोजित करत आहे. तर ईशान्येकडील राज्यांसोबत 19 जानेवारी रोजी बैठक होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com