जो बाइडेन प्रशासनात आणखी एक भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश

दैनिक गोमन्तक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

'सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस' च्य़ा मुख्य कार्यकारी अधिकारी नीरा टंडन 'ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट' च्या संचालकपदासाठी नामांकित करण्य़ाची योजना आखली आहे.    

वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन हे आपल्या चमूत अधिकाधिक भारतीय लोकांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. जो यांच्याबरोबर निवडून येणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष असतील. याच दरम्यान आणखीन एक भारतीय-अमेरिकी नाव समोर येत असून वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार बाइडेन यांनी 'सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस' च्य़ा मुख्य कार्यकारी अधिकारी नीरा टंडन 'ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट' च्या संचालकपदासाठी नामांकित करण्य़ाची योजना आखली आहे.    

याशिवाय अर्थशास्त्रज्ञ सेसिलिया राउज यांना बाइडेन आपल्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्षपद देऊ शकतात. वॉल स्ट्रीटने याबाबत सांगितले आहे की, बाइडेन हे ओबामा प्रशासनात वरिष्ठ आंतरराष्ट्रीय आर्थिक सल्लागार राहिलेल्य़ा वैली अॅडिमेयो यांना ट्रेजरी विभागात जेनेट येलेन यांच्याबरोबर सेवा देण्यासाठी नामांकित करू शकतात. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अर्थशास्त्रज्ञ जेरेड बर्नस्टीन आणि हीथर बाउशी यांना आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यपदी बसविले जाईल.

कोण आहेत नीरा टंडन?

'सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस'च्या अध्यक्षपदाआधी नीरा यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनात आरोग्य सल्लागारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्या २०१६च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटच्या हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार अभियानाच्या प्रमुख सल्लागार होत्या.

संबंधित बातम्या