Nepal Plane Crash: नेपाळमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, अपघाताचे कारण समजण्याची शक्यता

Nepal Plane Crash: 72 जण असलेल्या या विमानातील 68 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जणांचा शोध सुरु आहे. काल झालेल्या विमानाच्या या अपघातांनंतर नेपाळमध्ये याआधी झालेल्या विमानअपघातांविषयी बोलले जात आहे.
Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Twitter

Nepal Plane Crash: नेपाळच्या पोखरा विमानतळावर काल विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. 72 जण असलेल्या या विमानातील 68 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जणांचा शोध सुरु आहे. काल झालेल्या विमानाच्या या अपघातांनंतर नेपाळमध्ये याआधी झालेल्या विमानअपघातांविषयी बोलले जात आहे.

वातावरण खराब असल्याने डोंगराला धडक झाल्याचे नेपाळच्या शासनाने परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मात्र, विमानाचा नेमका अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याचा अधिक तपास सुरु असल्याची माहीती नेपाळ(Nepal )च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आता या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, त्यामुळे विमानाचा अपघातने नेमका कशामुळे झाला हे लवकरच उघड होईल असे म्हटले जात आहे. ब्लॅक बॉक्स हे असे उपकरण आहे जे एअरक्राफ्टमध्ये असते. हा ब्लॅक बॉक्स एअरक्राफ्ट आणि फ्लाइट यांचा परफॉर्मेंस रेकॉर्ड करतो. वेगवेगळे पैलू असलेला हा ब्लॅक बॉक्समध्ये एयरस्पीड, अल्टीट्यूड, व्हर्टिकल एक्सलेरेशन आणि फ्यूल फ्लो ला रिकॉर्ड करतो.

फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)असे दोन भाग असतात. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये वैमानिक आणि ट्राफिक( Traffic ) कंट्रोलमध्ये मध्ये झालेले बोलणे रेकॉर्ड होते. आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर हा अपघात का झाला होता हे लवकरच समजेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Nepal Plane Crash
Green Comet: अतंराळात 50 हजार वर्षांनंतर दिसले अदभूत दृष्यं; पृथ्वीच्या जवळून गेला हिरवा धुमकेतू

दरम्यान, रविवारी यती एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाने काठमांडू( Kathmandu ) विमानतळावरुन पोखरा विमानतळासाठी उड्डाण केले होते. मात्र, पोखरा विमानतळावर लॅंडींग करण्या १० सेंकदआधी विमानाचा दुर्देवी अपघात झाला. विमानाच्या अपघात कसा झाला याविषयी अधिक तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com