नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली संसदेत बहुमत सिध्द करण्यास ठरले अपयशी !

Nepals Prime Minister KP Sharma Oli fails to prove majority in Parliament
Nepals Prime Minister KP Sharma Oli fails to prove majority in Parliament

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओलींना (K.P. Sharma Oli) मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान ओली संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत सिध्द करण्यास अपयशी ठरले आहेत. एकूण 234 मतांपैकी 124 मतं त्यांच्या विरोधात पडली आहेत. पंतप्रधान ओली 275 सदस्य असलेल्या सदनात बहुमत सिध्द करण्यात अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान ओली यांना केवळ 93 मते पडली आहेत. त्यांना कमीतकमी 126 मतांची आवश्यकता होती. विश्वासमताची विरोधात 124 मतं पडली आहेत. त्यातील 15 सदस्य तटस्थ राहीले. तर 35 खासदार मतदानाच्यावेळी मात्र गैरहजर राहीले. त्यामुळे नेपाळच्या (Nepal) घटनेनुसार 100 (3) अंतर्गत त्यांचं पंतप्रधान गेलं आहे. (Nepals Prime Minister KP Sharma Oli fails to prove majority in Parliament)

पुष्पकमल दहल प्रचंड (Pushp Kamal Dahal Prachanda) यांच्या कम्युनिस्ट पक्षानं (Communist Party)ओली सरकारला दिलेलं समर्थन काढल्याने सरकार अल्पमतात आलं होतं. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने आपल्या खासदारानं व्हिप जारी करत पंतप्रधान ओलींच्या बाजूने मतदान करण्यास सांगितलं होतं. मात्र पक्षातील नाराज खासदारांची समजूत काढण्यास ते अपयशी ठरले आहेत.

फेब्रुवारी 2018 कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या समर्थानार्थानंतर ओली यांची पंतप्रधान पदी वर्णी लागली होती. ओली यांच्या सांगण्यावरुन नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी (Vidhya Devi Bhandari) यांनी डिसेंबर 2020 रोजी संसद विसर्जीत केली होती. त्यानंतर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींचा निर्णय रद्दबातल ठरवून ओली सरकारला बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला होता.

पंतप्रधान ओली यांनी भारताविरोधात (India) घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात मतभेद सुरु झाले होते. भारताविरोधात घेतलेल्या निर्णयामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये असंतोष होता. ओली यांच्या कार्यकाळातच नेपाळचा नवा नकाशा तयार करण्यात आला होता. या नकाशामध्ये कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळच्या नकाशामध्ये दाखवण्यात आले होते. तर दुसरीकडे चीननं (China) हुमला येथे नेपाळच्या सीमेजवळील बराच मोठा प्रदेश आपल्या अखत्यारीत घेतला होता. त्यामुळे नेपाळी लोकांच्या मनात असंतोष होता. भारतात असलेली आयोध्या (Ayodhya) खरी नसून बनावट आयोध्या आहे. त्याचबरोबर प्रभू रामचंद्र हे नेपाळी होते असा अजब दावा नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केला होता.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com