व्हॉट्सअॅप, फेसबुकसह इन्स्टाग्राम गंडलय; नेटकरी चिंतेत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) बंद आहेत. यामुळे वापरकर्त्यांना वापरात अडचणी येत आहेत.
व्हॉट्सअॅप, फेसबुकसह इन्स्टाग्राम गंडलय; नेटकरी चिंतेत
WhatsApp, Facebook, InstagramDainik Gomantak

सोशल मीडिया साईट्स फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. तिन्ही सोशल साईट्स जगभर बंद आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. व्हॉट्सअॅपवर, वापरकर्ते नवीन संदेश पाठवू आणि प्राप्त करु शकत नाहीत.

WhatsApp, Facebook, Instagram
मेडिसीन क्षेत्रात डेविड जूलियस आणि आर्डेम पॅटपौटियनना नोबेल जाहीर

फेसबुक उघडताना, बफरिंग होत आहे याची जाणीव ठेवा, इन्स्टाग्रामवर रिफ्रेश करताना 'फीड रिफ्रेश करू शकत नाही' हा संदेश येत आहे. यामुळे युजर्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ट्विटरवर यासंदर्भात #instagramdown आणि #whatsappdown हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. वापरकर्ते यावर आपला अभिप्राय देत आहेत. अनेक वापरकर्ते ट्विटरवर तक्रार करत आहेत की, ते त्यांचे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरु शकत नाहीत. व्हॉट्सअॅप वापरकर्ते मजकूर संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाहीत. तसेच, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल देखील करता येत नाहीत.

Related Stories

No stories found.