कोरोनाचा नवा स्ट्रेन; कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येताही होतोय कोरोना 

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या  साथीने थैमान घातले आहे. लाखो  लोक दररोज कोरोनाचे बळी ठरत आहेत, दिवसेंदिवस कोरोनाबाधित लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या  साथीने थैमान घातले आहे. लाखो  लोक दररोज कोरोनाचे बळी ठरत आहेत, दिवसेंदिवस कोरोनाबाधित लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत (Sri Lanka)  याहून प्राणघातक स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन हवाजनित (हवेत निर्माण झालेला) आहे,  म्हणजेच, एखाद्या संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्कात न येताही हा स्ट्रेन हवेमार्फत व्यक्तीला संक्रमित करू शकतो.  श्रीलंकेच्या जयवर्धनपुरा विद्यापीठाच्या इम्यूनोलॉजी आणि आण्विक विज्ञान विभागाच्या प्रमुख नीलिका मालाविगे यांनी या नव्या स्ट्रेनबाबत माहिती दिली आहे.  हा स्ट्रेन अत्यंत वेगाने हवेत पसरतो आणि व्यक्तीला संक्रमित करतो.  इतकेच नव्हे तर हा स्ट्रेन हवेत एक तास जिवंत राहू शकतो. श्रीलंकेत सापडलेल्या सर्व प्रकारांपैकी कोरोनाचा हा स्ट्रेन सर्वात प्राणघातक असून सर्वात जलद पसरला आहे. (New and airborne COVID-19 strain found in Sri Lanka) 

Coronavirus: भारतातील चिंताजनक स्थितीवर पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले...

तरुणांमध्ये संक्रमाणाचे  प्रमाण सर्वात जास्त 
गेल्या आठवड्यात नवीन वर्षाच्या उत्सवापासून नवीन स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची भीती श्रीलंका आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे. नववर्षाच्या उत्सवानंतर श्रीलंकेत तरुण वर्गात हा स्ट्रेन सर्वात जास्त प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन आठवड्यांत या स्ट्रेनच्या संसर्गामुळे बाधित लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊ शकते. जर कोरोनाच्या या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली तर देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता सार्वजनिक आरोग्य निरीक्षक उपल रोहाना  यांनी वर्तवली आहे.  त्यामुळे कोरोनाच्या या स्ट्रेनपासून संरक्षण करण्यासाठी 31 मे पर्यंत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. पहिल्या स्ट्रेनची लक्षणे इतकी स्पष्ट नव्हती. मात्र तरुणांमध्ये नव्या स्ट्रेनचे संक्रमण सर्वात वेगाने झाल्याचे दिसून येत असल्याचे उपल रोहाना  यांनी म्हटले आहे. 

युनायटेड एअरलाइन्सची उड्डाणे उद्यापासून सुरू

रुग्णालयात दाखल न झालेल्या रुग्णांना  60 टक्के अधिक धोका 
जरी अनेक कोरोना संक्रमित लोकांनी रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार केले, त्यांना दीर्घ गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे. नेचर या जर्नलमध्ये प्रसिद्ध  रुग्णालयात दाखल न करण्यात आलेल्या  73 हजाराहून अधिक संक्रमित लोकांच्या वैद्यकीय नोंदींची तपासणी करण्यात आली.  झालेल्या संशोधनात असे आढळून आले की,  संसर्गाच्या सहा महिन्यांतच,  रुग्णालयात दाखल झालेल्या आणि कोरोनाची गंभीर लक्षणे झालेल्या लोकांपेक्षा, रुग्णालयात उपचार न घेतलेल्या लोकांना मृत्यूचा धोका 60 टक्के जास्त आहे. 

संबंधित बातम्या