नव्या कोरोनामुळे ब्रिटन पडले एकाकी; शेजारील देशांनी सीमा केल्या बंद

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

लंडन ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषाणूचे नवे संसर्गजन्य रूप समोर आल्यानंतर विविध युरोपियन देशांनी आपल्या सीमा बंद करायला सुरवात केली आहे.

लंडन : लंडन ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषाणूचे नवे संसर्गजन्य रूप समोर आल्यानंतर विविध युरोपियन देशांनी आपल्या सीमा बंद करायला सुरवात केली आहे. आता फ्रान्सनेही अन्य देशांचा कित्ता गिरविताना आपल्या सीमा सील केल्या आहेत. याआधी जर्मनी, इटली, बेल्जियम, डेन्मार्क, बल्गेरिया, आयरिश रिपब्लिक, तुर्कस्तान आणि कॅनडा या देशांनी हा निर्णय घेतला होता. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा इंग्लंडच्या अनेक भागांमध्ये वेगाने प्रसार होत असल्याचे आढळून आले आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रवास वर्तुळामध्ये ब्रिटनचाही समावेश असल्याने चाचण्या आणि विलगीकरणाचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. ब्रिटनने अनेक भागांमध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन लागू केला आहे.

 

युरोपीय महासंघ चिंतित

रविवारी एकाच दिवसामध्ये ब्रिटनमधील बाधितांची संख्या ३५ हजारांनी वाढल्याने युरोपीय महासंघाचे सदस्य असणाऱ्या देशांनी ब्रुसेल्समध्ये विचारमंथन करत नव्याने रणनीती आखायला सुरवात केली आहे. हा जीवघेणा विषाणू असल्याने त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवायला हवे, असे ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी सांगितले. त्यानंतर इतर देश सावध झाले आहेत.

प्रवासावर निर्बंध

हाँगकाँग, इस्राईल, इराण, क्रोएशिया, चिली, मोरोक्को आणि कुवेत या देशांनी देखील ब्रिटनसोबतच्या प्रवासावर निर्बंध आणले आहेत. फ्रान्सने प्रवासावर निर्बंध आणल्यानंतर सीमावर्ती भागांमध्ये चेकपोस्टवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

अधिक वाचा :

नोपाळमध्ये जाहीर झालेली मुदतपूर्व निवडणुक पंतपधान ओली यांना अमान्य

‘अल-जझीरा’वर सायबर हल्ला ; सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा हात असल्याचा 

 

संबंधित बातम्या