नववर्षाच्या स्वागतासाठी तयार केलेलं गुगलचं खास डुडल बघितलं का ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

सन  २०२१ वर्षाचं  काउंटडाउन सुरू झालं असतानाच, 2020 ला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज 31 डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा दिवस आहे जो जगभरात न्यू ईयर'स इव्ह म्हणून साजरा केला जातो.

नवी दिल्ली :   सन २०२१ वर्षाचं  काउंटडाउन सुरू झालं असतानाच, 2020 ला निरोप देण्याची वेळ आली आहे, ज्या वर्षानी आपली खूप परीक्षा बघितली. आज 31 डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा दिवस आहे जो जगभरात न्यू ईयर'स इव्ह म्हणून साजरा केला जातो. गूगलने आजचा हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी एक खास डूडल बनवलंय.यावेळी गुगलनी ने आपले हॉलिडे डूडल जुन्या फॅशन-बर्ड-हाऊस क्लॉकसह डिझाइन केले आहे जे त्यावर 2020 लिहिलंय, आणि हा दिवस संपताच, ते 2021 होईल. 

या डूडलशिवाय गुगलनी एक संदेश देखील दिला आहे जो म्हणतो, "नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 2020 च्या घड्याळाचे काटे पढे सरकत आहेत, आता उलटी गिनती सुरू होईल आणि जेव्हा घड्याळात 12 वाजले, की नवे वर्ष सुरू होईल, या नव्या वर्षात नवे पंख पसरून आकाशात उंच झेप घ्या".

संबंधित बातम्या