
Earthquake Of Magnitude 7.1 Hits Kermadec Islands In New Zealand: न्यूझीलंडमध्ये आज भुकंपाचे धक्के जाणावले आहे. या भुकंपाची तीव्रता 7.1 होती. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या मते, न्यूझीलंडच्या केर्मडेक बेटांमध्ये 7.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर त्या ठिकाणी त्सुनामीचा अलर्टही जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात त्सुनामी येऊ शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, तुर्कि आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठे नकसान झाले आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्किच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. हे सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर आहे.
अशा स्थितीत या भूकंपामुळे दोन्ही देशांत प्रचंड नुकसान झालं. यामध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकांची घरंही उद्ध्वस्थ झाली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.