भारतीय नागरीकांना न्यूझीलंड मध्ये नो एंट्री

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

गुरुवारी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अॅर्डर्न यांनी सर्व प्रवाशांचे भारतातून आगमन तात्पुरत्या काळासाठी थांबवले आहे. न्यूझीलंडने सर्व प्रवाशांचे प्रवेश 28 एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत.

वेलिंग्टन : गुरुवारी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अॅर्डर्न (Jacinda Ardern) यांनी सर्व प्रवाशांचे भारतातून आगमन तात्पुरत्या काळासाठी थांबवले आहे. न्यूझीलंडने सर्व प्रवाशांचे प्रवेश 28 एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. देशात कोरोना संसर्गाची 1 लाखाहून अधिक प्रकरणे येऊ लागली न्यूझीलंडने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 11 एप्रिलपासून अंमलात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोना संक्रमणाच्या वाढत्या संख्येत भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकावरचा सर्वात प्रभावी देश आहे. जगातील सर्वाधिक कोरोना प्रकरणे दररोज भारतात आढळत आहेत. कोरोना मृत्यूच्या दरामध्ये भारत नंतर अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोचा क्रमांक लागतो.

संसदच महिलांसाठी असुरक्षित; ऑस्ट्रेलियात हजारो स्त्रिया उतरल्या रस्त्यावर 

कोरोना लस देण्याची मोहीम 16 जानेवारीपासून देशात सुरू झाली. 7 एप्रिल पर्यंत देशभरात 8 कोटी 70 लाख कोरोना डोस देण्यात आले आहेत. काल देशात 33 लाख 37 हजार लसीकरण झाले. लसीचा दुसरा डोस देण्याची मोहीम 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. तर 1 एप्रिलपासून, 45 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्यात येत आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. भारतात सुरू असलेल्या कोरोना साथीच्या परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन बद्दल चर्चा होणार. या व्यतिरिक्त लसीकरण मोहिमेबद्दलही बोलले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जीसुद्धा या बैठकीला असणार अशी माहिती देण्यात आली आहे. 

अ‍ॅस्ट्राझेनेकाने सीरम इन्स्टिटयूटला कायदेशीर नोटीस पाठविली आहे

मुख्यमंत्र्यांसोबत पीएम मोदी यांची अखेरची चर्चा 17 मार्च रोजी साथीच्या विषयावर झाली होती. पंतप्रधानांनी काही राज्यांमधील वाढत्या प्रकरणांवर गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि दुसरी लाट थांबविण्यासाठी त्वरित व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाच कलमी सूत्रांचे पालन करायला सांगितले होते. त्यामध्ये तपासणी, संक्रमित व्यक्तींची ओळख, उपचार, कोरोना नियमांचे कठोर पालन आणि लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. 

संबंधित बातम्या