Pakistan Blast Video: पाकिस्तानमध्ये आत्मघातकी स्फोटात 9 पोलिस ठार, 13 जखमी

आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
Pakistan Blast Video
Pakistan Blast VideoTwitter

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान पोलिस कर्मचारी ठार झाले असून, 13 जण जखमी झाले आहेत. सोमवारी ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

क्वेटा-सिबी महामार्गावरील कांब्री पुलावर बलुचिस्तान येथे जवानांच्या ट्रकजवळ हा स्फोट झाला, असे एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

प्राथमिक पुराव्यांवरून हा आत्मघातकी हल्ला असल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मेहमूद नोटझाई यांनी म्हटले आहे. मात्र, स्फोटाचे नेमके स्वरूप तपासानंतर कळू शकेल. असे त्यांनी सांगितले.

बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले असून परिसरात तपास सुरू आहे. बोलान येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात बलुचिस्तान कॉन्स्टेब्युलरीचे किमान नऊ जवान ठार झाले आणि 13 जण जखमी झाले, असे नोटझाई यांनी सांगितले. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pakistan Blast Video
Jim Mattis:...तर चीन भारतावर हल्ला करू शकतो, अमेरिकेच्या माजी संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

बलुचिस्तान कॉन्स्टेब्युलरीचे (बीसी) जवान सिबी मेला येथे कर्तव्यावरून परतत असताना त्यांना टार्गेट करण्यात आले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे ट्रक उलटला, असे अहवालात म्हटले आहे.

मृतदेह आणि जखमी जवानांना सिबी जिल्ह्यात हलवण्यात आले असून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉन्स्टेब्युलरी हा पोलिस दलाचा एक विभाग आहे जो तुरुंगांसह महत्त्वाचे कार्यक्रम आणि संवेदनशील भागात सुरक्षा पुरवतो. खैबर पख्तुनख्वा प्रांत आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात हा स्फोट झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com