No Any use of Graduation degree in  Afghanistan says Taliban education minister Abdul Baqi Haqqani
No Any use of Graduation degree in Afghanistan says Taliban education minister Abdul Baqi Haqqani Dainik Gomantak

तालिबान राजवटीत आता शिक्षणही 'अवैध', सरकारचा अजब कायदा

तालिबान (Taliban) सरकारचे उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी जाहीर केले आहे की....

तालिबानने (Taliban)अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यापासून सर्व काही सतत बदलत आहे.त्याचबरोबर तालिबानच्या राजवटीत (Taliban Government)दररोज नवीन तालिबानी आदेश आणि असे निवेदने जारी केली जात आहेत ज्यामुळे सगळेच अचंबित होत आहेत. काहीदिवसांपूर्वीच , महिलांना विद्यापीठात वर्ग घेण्यास बंदी घालण्यात आली होती, याशिवाय तालिबान सरकारने विद्यापीठात नवीन कुलगुरूंची नियुक्ती देखील केली होती.हे सारे कमी होते की काय आता आणखीन एक नवीन तालिबानी आदेश या सरकारकडून काढण्यात आला आहे. आणि या कायद्यात 2000 ते 2020 दरम्यान हायस्कूल केलेल्यांची पदवी निरुपयोगी असेल असे सांगण्यात आले आहे. अफगाणच्या स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली आहे.(No Any use of Graduation degree in Afghanistan says Taliban education minister Abdul Baqi Haqqani)

No Any use of Graduation degree in  Afghanistan says Taliban education minister Abdul Baqi Haqqani
इराण आणि ओमानला शाहीन चक्रीवादळाचा फटका,11 जणांचा मृत्यू

तालिबान सरकारचे उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी जाहीर केले आहे की 2000 ते 2020 दरम्यान देशातील उच्चशिक्षकांचा आता काहीच उपयोग नाही.त्याचबरोबर शिक्षकांच्या नियुक्तीबाबत हक्कानी म्हणाले की, अशा शिक्षकांची नेमणूक केली पाहिजे जे विद्यार्थी आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये मूल्ये रुजवू शकतील.शिवाय, त्यांनी धार्मिक अभ्यासावर भर दिला आणि सांगितले की आधुनिक अभ्यासात मास्टर्स आणि पीएचडी धारक मदरशांमध्ये शिकलेल्यांपेक्षा कमी मूल्यवान आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com