कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "पाकिस्तानसह अन्य काही देशांना ब्रिटन मध्ये नो एंट्री" 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आली असून, त्याच अनुशंघाने अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून निर्बंध लागू केले असल्याचे दिसते आहे.

कोरोना महामारीमुळे पुन्हा जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आली असून, त्याच अनुशंघाने अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून निर्बंध लागू केले असल्याचे दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनने पाकिस्तान आणि अन्य काही देशांमधील प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. (No entry into Britain to some other countries including Pakistan on the background of corona)

ब्रिटनने घेतलेल्या या निर्यणयात प्रवेश बंदी केलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश, केनिया आणि फिलिपिन्सचा देखील समावेश आहे. या देशांमधून येणाऱ्या  ब्रिटीश किंवा आयरिश वंशाच्या लोकांच्या प्रवाशांवर बंदी घातली गेली नसली तरी त्यांना 10 दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.रेड लिस्ट यादी मध्ये समाविष्ट असणाऱ्या या देशांतून येणाऱ्या लोकांची 2 वेळा कोरोना चाचणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील (Pakistan) ब्रिटिश उच्चायुक्त क्रिश्चियन टर्नर (Cristian Turner) यांनी दिली आहे.

दरम्यान, ब्रिटन (Britain) मध्ये प्रवेश निषेध असलेल्या या देशांच्या यादी मध्ये अंगोला, अर्जेंटिना, बोलिव्हिया, बोत्सवाना, ब्राझील, बुरुंडी, केप वर्डे, चिली, कोलंबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इक्वाडोर, एस्वेतिनी, इथिओपिया, फ्रेंच गुयाना, गयाना, लेसोथो, मलावी, मोझांबिक, नामीबिया, ओमान, पनामा, पराग्वे, पेरू, कतार, रवांडा, सेशल्स, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, सुरिनाम, टांझानिया, संयुक्त अरब अमिराती, उरुग्वे, व्हेनेझुएला, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश असल्याचे समजते आहे. 

संबंधित बातम्या