अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना रशियात 'नो एंट्री'

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील यादीत अमेरिकन सरकारी अधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि इतर प्रमुख व्यक्तींचीही नावे आहेत.
US President Joe Biden
US President Joe Biden Dainik Gomantak

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू होऊन आता 3 महीने झाले आहेत, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. रशियाला लगाम घालण्यासाठी अनेक बड्या देशांनी अनेक प्रकारचे निर्बंधही लादले, पण त्याचा रशियावर काहीही परिणाम झाला नाही. आता रशियाने अनेक देशांवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. रशियाने शनिवारी 963 प्रमुख अमेरिकन लोकांची यादी जाहीर केली आहे ज्यांना रशियामध्ये प्रवेश मिळणार नाही. (No entry to US President Joe Biden in Russia)

US President Joe Biden
Quad Summit 2022: PM मोदी राहणार उपस्थित, क्वाड म्हणजे काय अन् चीन का घाबरतो?

जो बायडन, मार्क झकरबर्ग रशियाला जाऊ शकणार नाहीत
या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग आणि हॉलिवूड अभिनेता मॉर्गन फ्रीमन यांचा समावेश आहे. युक्रेन युद्धात अमेरिकेने रशियाच्या काही प्रभावशाली लोकांवर निर्बंध लादले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानेही अमेरिकेतील प्रभावशाली लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

US President Joe Biden
इम्रान खान यांनी परत केले भारताचे कौतुक

या यादीत सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील यादीत अमेरिकन सरकारी अधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि इतर प्रमुख व्यक्तींचीही नावे आहेत. त्याच वेळी, रशियाने यापूर्वी एक यादी जारी करून अनेक अमेरिकन लोकांवर निर्बंध जाहीर केले होते.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही प्रामाणिक चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. अमेरिकेतील लोकांना आणि अधिकाऱ्यांना रुसोफोबिया झाला आहे. त्यांच्यावर निर्बंध लादणे गरजेचे होते. रशियाने कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नी सोफी ट्रूडोसह आणखी 26 कॅनेडियन लोकांवर निर्बंध लादले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com