किम जोंग-उन च्या डोक्यात चाललंय तरी काय? उत्तर कोरिया अण्वस्त्रांना बनवतंय अजून धोकादायक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

संयुक्त राष्ट्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार , उत्तर कोरियाने आपल्या आण्विक शस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरणाला मंजूरीला देत, यासाठी लागणारी सामग्री आणि तंत्रज्ञान इतर देशांकडून मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार , उत्तर कोरियाने आपली आण्विक शस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणाला मंजूरीला देत, यासाठी लागणारी सामग्री आणि तंत्रज्ञान इतर देशांकडून मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी सुरक्षा परिषदेला सादर केलेल्या अहवालात उत्तर कोरियावर लादलेल्या यूएनच्या (संयुक्त राष्ट्र) निर्बंधांवर नजर ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने, किम जोंग उनच्या सरकारने अशी सामग्रीही तयार केली आहे, ज्यामुळे धोकादायक अण्वस्त्रे बनवली जाऊ शकत असल्याचे सांगितले आहे.

भारताची अफगाणिस्तानला काबुल नदीवरील 'शहतूत' धरणाची भेट

संयुक्त राष्ट्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, "उत्तर कोरियाने आपल्या सैन्याच्या परेडमध्ये शॉर्ट-रेंजची नवीन क्षेपणास्त्रे, मध्यम-श्रेणी, पाणबुडी आणि आंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले. त्यांनी नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शस्त्रांची चाचणी आणि बांधकाम आणि सामरिक आण्विक शस्त्रे विकसित करण्याची आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियाने 2006 मध्ये प्रथमच अणुचाचणी केली होती, त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर कडक निर्बंध लादले होते. प्योंगयांगचे अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियाच्या बहुतेक निर्यातीवर आणि आयातीवर मोठ्या प्रमाणात बंदी घातली आहे.

पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांना अवकळा; पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

असोसिएटेड प्रेसला मिळालेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, उत्तर कोरिया आपला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करीत आहे, निर्बंधाकडे दुर्लक्ष करून आंतरराष्ट्रीय बँकिंग वाहिन्यांचा वापर करीत बेकायदेशीरपणे तेल आयात करीत आहे आणि गुन्हेगारी, सायबर कारवायांना प्रोत्साहन देत आहे.

 

संबंधित बातम्या