उत्तर कोरियाने पुन्हा डागले अज्ञात लक्ष्यावर मिसाइल, दक्षिण कोरियाचा दावा

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला
North Korea President of Kim Jong Un
North Korea President of Kim Jong UnDainik Gomantak

North Korea Fires Projectile: दक्षिण कोरियाच्या लष्कराने दावा केला आहे की उत्तर कोरियाने पुन्हा एकदा पूर्वी अज्ञात लक्ष्याला लक्ष्य करणारी क्षेपणास्त्रे डागली आहेत. उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. याबाबतची माहिती दक्षिण कोरियाच्या (South Korea) जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली आहे. जेव्हा किम जोंग उन यांनी गरज पडल्यास अण्वस्त्रांचा वापरही करू शकतो, अशी थेट धमकी अनेकवेळा दिल्यानंतर उत्तर कोरियाने ही कारवाई केली आहे. (North Korea Blast a Missile)

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) याने अलीकडेच एका नवीन सामरिक मार्गदर्शित शस्त्राची चाचणी घेतली. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी सराव दरम्यान ही चाचणी घेण्यात आली. उत्तर कोरियानेही या चाचणीचे फोटो शेअर केले आहेत.

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका लावला

उत्तर कोरियाने या वर्षात आतापर्यंत 13 वेळा शस्त्रास्त्रांची चाचणी केली आहे. या चाचण्यांमध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीचाही समावेश आहे. या प्रकरणातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निर्बंधांमध्ये सवलत मिळण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणण्याच्या उद्देशाने उत्तर कोरिया सातत्याने शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com