आणि किम जोंग उन रडले....

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

देशासाठी बलिदान देणारे सैनिक आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात अपयश आले अशांची माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. तब्बल आठवडाभरापूर्वीचा त्यांचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

सेऊल- क्रौर्य आणि तितक्याच कडवट स्वभावासाठी जगभर कुख्यात असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे लष्करी कवायतीसमोर मार्गदर्शन करताना विशेष भावूक झालेले दिसले. देशासाठी बलिदान देणारे सैनिक आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात अपयश आले अशांची माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. तब्बल आठवडाभरापूर्वीचा त्यांचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

वर्कर्स पार्टीच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना किम भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वादळाचा सामना करताना आणि कोरोनाशी दोन हात करताना कोरियन लष्कराने दाखविलेल्या धाडसाला देखील त्यांनी सलाम केला. 
 

संबंधित बातम्या