उत्तर कोरियाची अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी,अमेरिकेसह जगाला थेट इशारा

लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची (newly-developed new-type long-range cruise missiles) जलद चाचणी करून उत्तर कोरियाने (North Korea) पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
उत्तर कोरियाची अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी,अमेरिकेसह जगाला थेट इशारा
North Korea test new type long-range cruise missiles Dainik Gomantak

लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची (newly-developed new-type long-range cruise missiles) जलद चाचणी करून उत्तर कोरियाने (North Korea) पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने उत्तर कोरियाचे राज्य माध्यम केसीएनएच्या (KCNA) हवाल्याने ही माहिती दिली आहे.त्यातच या चाचण्याचा टाइमिंगवरही सगळ्यांचे लक्ष आहे कारण जेव्हा तालिबान (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) परतला आहे आणि अमेरिकेला (USA) तिथून परत यावे लागले आहे आणि अशातच उत्तर कोरियाने केलेल्या या चाचण्या . उत्तर कोरियाचे हे पाऊल देखील लक्षात घेण्यासारखे आहे कारण अमेरिकेसोबत अण्वस्त्र नि: शस्त्रीकरणावरून प्रदीर्घ काळ सुरू असलेला संघर्ष अजूनही संपलेला दिसत नाही.(North Korea test new type long-range cruise missiles )

शनिवारी आणि रविवारी झालेल्या चाचण्यांदरम्यान, या क्षेपणास्त्रांनी 1,500 किलोमीटर (930 मैल)इतके अंतर गाठले आहे. केसीएनएने म्हटले आहे की क्षेपणास्त्रांचा विकास उत्तर कोरियाची सुरक्षा अधिक विश्वासार्ह बनविण्याची हमी देतो. देशात तयार केलेल्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे शत्रु शक्तींच्या लष्करी युक्तीला जोरदारपणे रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक साधन ठरणार आहे.

हे उल्लेखनीय आहे की उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियावर प्योंगयांगच्या विरोधात धोरणात्मक शत्रुत्वाचा आरोप केला आहे. उत्तर कोरियाचे आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेबरोबरची त्याची चर्चा 2019 पासून थांबली आहे.तज्ञांचे म्हणणे आहे की क्षेपणास्त्रांची चाचणी करणे उत्तर कोरियाच्या विचारपूर्वक धोरणाचा भाग आहे. स्वत: वर लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध संपवण्यासाठी ते अमेरिकेवर चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी अशा चाचण्या करत आहेत.

North Korea test new type long-range cruise missiles
भारताला शह देण्यासाठी तालिबानी सरकार पाकिस्तान चालवत आहे :गुप्तचर संघटना

अलीकडेच, संयुक्त राष्ट्रांच्या अणु एजन्सीने म्हटले आहे की उत्तर कोरियाने अणू इंधन निर्मितीसाठी आपल्या मुख्य अणुभट्टीचे काम पुन्हा सुरू केल्याचे दिसत आहे. इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, उत्तर प्योंगयांगच्या योंगब्यॉनमधील उत्तर कोरियाच्या मुख्य अणुसंकुलात पाच मेगावॅटची अणुभट्टी होती. वृत्तसंस्था एपीने आपल्या अहवालात म्हटले आहे की अणुभट्टी प्लूटोनियम तयार करते ज्याचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करता येतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com