उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन अण्वस्त्र वाढविण्यात मग्न

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

उत्तर कोरिया पुन्हा एकदा अण्वस्त्र क्षेपणास्त्रांची क्षमता वाढविण्याच्या विचारात आहे. यासाठी तो आपल्या क्षेपणास्त्र-विकसित सुविधा केंद्रांचा सतत विस्तार करीत आहे.

सिओल: उत्तर कोरिया पुन्हा एकदा अण्वस्त्र क्षेपणास्त्रांची क्षमता वाढविण्याच्या विचारात आहे. यासाठी तो आपल्या क्षेपणास्त्र-विकसित सुविधा केंद्रांचा सतत विस्तार करीत आहे. दक्षिण कोरियातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय नॅशनल असेंब्ली डिफेन्स कमिटी फॉर पॉलिसीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या नष्ट झालेल्या अण्वस्त्र चाचणी साइट्समध्ये कोणत्याही प्रकारच्या विलक्षण गोष्टी पाहिल्या गेल्या नाहीत, असेही अहवालात म्हटले आहे. याशिवाय, ब-याच काळापासून निलंबित असलेल्या प्लूटोनियम उत्पादक अणुभट्टीमध्ये बदल झालेला नाही.

अहवालानुसार 24 मे 2018 मध्ये उत्तर कोरियाने पुंग्येरी न्यूक्लिअर अणु चाचणी साइट नष्ट केल्यानंतर कोणतीही विशिष्ट हालचाल दिसून आली नाही. त्याचप्रमाणे अण्वस्त्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लूटोनियमचा प्रमुख स्त्रोत असलेल्या यॉन्‍गब्‍यॉनचे 5 मेगावॅटचा अणू संकुल तसाच आहे. असे असूनही दक्षिण कोरियाला असे वाटते की उत्तर कोरिया क्षेपणास्त्र संशोधन आणि विकासासाठी सुविधा वाढवित आहे. असे म्हटले आहे की, अमेरिकेबरोबर झालेल्या तीन संवादानंतरही काही साध्य झाले नाही. त्यानंतर उत्तर कोरियाने आपले अण्वस्त्रे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थेनुसार उत्तर कोरियाने 2019 पासून काही नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे अनावरण केले आहे. ही क्षेपणास्त्र पाणबुडी लाँच बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आवृत्ती असून त्यात रशियन इस्कंदर आणि अमेरिकन आर्मी टेक्निकल मिसाईल सिस्टीमचा समावेश आहे. या अनावरणबरोबरच उत्तर कोरियाने आपला शो ऑफ दाखवला आहे. किमला वाटते की, या शस्त्रास्त्रांनी आपला दर्जा आणखी वाढविला आहे. दक्षिण कोरियाच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियाने सीमेजवळील जमीन व सागरी संरक्षण वाढविले आहे. याशिवाय ते आपल्या सैनिकांना लष्करी प्रशिक्षण देण्यातही व्यस्त आहेत. जागतिक साथीच्या कोविड -19 मुळे, उत्तर कोरियाचे सैनिक त्यांच्या केंद्रांवर राहून ड्रिलमध्ये भाग घेत आहेत.

G-7 च्या महत्वाच्या बैठकीत भारताला विशेष स्थान -

दक्षिण कोरिया उत्तर कोरियामधील लष्करी आणि राजकीय कामांवर सतत नजर ठेवून आहे. एका ब्रीफिंग दरम्यान संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेला उत्तर कोरियाच्या सैन्याकडे वॉरटाइम ऑपरेशनल कंट्रोल wartime operational control (OPCON) त्वरीत करण्यास सांगितले आहे.  अमेरिका आणि उत्तर कोरिया एकत्रितपणे ऑपकॉनवर काम करीत आहेत. मात्र यासाठी कोणतीही मुदत निश्चित केलेली नाही. राष्ट्रपती मून जे यांना आशा आहे की हे त्यांच्या कार्यकाळात (मे 2022 पर्यंत) पूर्ण हेईल.  संरक्षणमंत्री असेही म्हणतात की दक्षिण कोरियाला या अकादमीमधून हे दाखवायचे आहे की ते एकटे नाही.

 

संबंधित बातम्या