उत्तर कोरियातील हॅकरने केली अमेरिकेतील व्हर्च्युअल खात्यांमधून चोरी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

उत्तर कोरियामध्ये राहणाऱ्या दोन हॅकरनी काही महिन्यांपूर्वी २५ कोटी डॉलरची चोरी करत त्यातील १० कोटी रुपये विविध खात्यांमध्ये हस्तांतरीत केल्याचे उघड झाले होते.

वॉशिंग्टन: उत्तर कोरियामधील हॅकरने अमेरिकेतील व्हर्च्युअल चलन खात्यांमधून कोट्यवधी डॉलर चोरले आणि चोरीचा माग न लागण्यासाठी त्यांनी ते विविध खात्यांवर हस्तांतरीत केले, असा गुन्हा अमेरिकेत न्याय खात्याने केलेल्या तक्रारीनंतर नोंदविण्यात आला आहे. या चोरीनंतर २८० व्हर्च्युअल खाती बंद करावीत, अशी मागणी येथील न्यायालयात करण्यात आली आहे. 

उत्तर कोरियामध्ये राहणाऱ्या दोन हॅकरनी काही महिन्यांपूर्वी २५ कोटी डॉलरची चोरी करत त्यातील १० कोटी रुपये विविध खात्यांमध्ये हस्तांतरीत केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अमेरिकेत दोन चिनी हॅकरविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या