'लग्नापूर्वी संबंध न ठेवणं हे प्रेमाचं लक्षण', या धर्मगुरुच्या वक्तव्यावरुन गदारोळ

पोप फ्रान्सिस यांनी नुकतेच लग्नापूर्वी सेक्स संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Pope Francis
Pope FrancisDainik Gomantak

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांनी नुकतेच लग्नापूर्वी सेक्स संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. पोप फ्रान्सिस म्हणाले की, 'लग्नापूर्वी सेक्सपासून दूर राहणे हे खरे प्रेमाचे लक्षण आहे.' पोप फ्रान्सिस यांनीही या विषयावर सांगितले की, 'लग्नापूर्वी सेक्स न केल्याने नाते जास्त काळ टिकते.'

लग्नाआधी सेक्स करण्यास नकार हे खऱ्या प्रेमाचे लक्षणः पोप

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यावेळी पोप फ्रान्सिस यांनी लग्नापूर्वी (Marriage) सेक्स करण्यास मनाई करणे हे खरे प्रेमाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. पोप फ्रान्सिस यांनी लग्नापूर्वी सेक्सपासून दूर राहण्याचे कौतुक करत हे वक्तव्य केले आहे.

Pope Francis
''अमेरिकन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा अधिकार''

पोप यांच्या वक्तव्याने सेक्सचे महत्त्व कमी केले?

खरं तर, पोप फ्रान्सिस यांनी नवीन 97 पृष्ठांच्या व्हॅटिकन गाइडमध्ये आनंदी नातेसंबंधांचे नियम मांडले आहेत. पोप यांनी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असा दावाही केला आहे की, आजच्या युगात पती-पत्नीसारखे महत्त्वाचे नाते लैंगिक तणावामुळे किंवा दबावामुळे लवकर तुटते. दस्तऐवजात इंटरनेटच्या अतिवापराचाही उल्लेख आहे, त्यावर टीकाही झाली आहे.

पोप यांच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया

खरंतर, काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी नवीन 97 पानांच्या व्हॅटिकन गाइडमध्ये आनंदी नातेसंबंधांचे नियम मांडले आहेत. आजकाल लैंगिक तणाव किंवा दबावामुळे जोडप्यांचे नाते लवकर तुटते, असा दावाही पोप यांनी केला. दस्तऐवजात इंटरनेटच्या (Internet) अतिवापराचाही उल्लेख आहे, त्यावर टीकाही झाली. त्याचबरोबर लग्नापूर्वी सेक्सबाबतच्या या वक्तव्यावर लोक त्यांच्या समजुतीनुसार प्रतिक्रिया देत आहेत.

Pope Francis
बंदूक कायद्याच्या बाजूने अमेरिकन नेत्याने केला अजब युक्तिवाद, म्हणाले- 9/11 हल्ल्यानंतर आम्ही विमानांवर बंदी घातली नाही

त्याचवेळी, या विधानाबाबत धर्मशास्त्रज्ञ विटो मॅनकुसो यांनी पोप यांच्या या वक्तव्यामुळे नात्यातील सेक्सचे महत्त्व कमी झाल्याचे म्हटले आहे.

Pope Francis
कमला हॅरिस यांनी अमेरिकन नागरिकांना केले द्वेष-हिंसाचार संपविण्याचे आवाहन

काही काळापूर्वी या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते

85 वर्षीय पोप फ्रान्सिस यांनी काही दिवसांपूर्वी मुलांपेक्षा पाळीव प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांना स्वार्थी म्हटले होते. मग ते म्हणाले की, मुलांपेक्षा पाळीव प्राण्यांवर प्रेम करणे ही आपली माणुसकी हिरावून घेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com