व्हॉट्सअ‍ॅप नव्हे, तर हे बनलं सगळ्यात जास्त डाऊनलोड होणारं अ‍ॅप

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप टेलीग्रामसाठी वर्ष 2021 ची सुरुवात खूप चांगली झाली. टेलीग्राम हे सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप बनलं आहे. 

नवी दिल्ली. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप टेलीग्रामसाठी वर्ष 2021 ची सुरुवात खूप चांगली झाली. टेलीग्राम हे सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप बनलं आहे. यात टेलीग्रामनी टिकटॉक, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या अ‍ॅप्सला मागे टाकले आहे. जानेवारीत टेलिग्राम हे जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेले नॉन-गेमिंग अ‍ॅप बनले आहे ज्यात 63 दशलक्षांहून अधिक लोकांनी हे डाऊनलोड केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून झालेल्या वादाचा फायदा टेलीग्रामला झाल्याची चर्चा आहे.

सर्वाधिक डाऊनलोडींग भारतात

डेटा एनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवरने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2020 च्या तुलनेत ह्या वर्षी 2021 मध्ये 3.8 पट जास्त लोकांनी टेलिग्राम डाऊनलोड कोलं आहे. टेलिग्राम डाऊनलोड करणारे बहुतेक वापरकर्ते हे भारतातील आहेत. जानेवारीत टेलिग्राम डाऊनलोड केलेल्या 63 दशलक्षांपैकी 24 टक्के लोक हे भारतातील होते. म्हणजेच भारतीयांनी सर्वाधिक टेलीग्राम डाऊनलोड केले. यानंतर, 10 टक्के वापरकर्ते इंडोनेशियातील होते.  सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार, टिकटॉक सुमारे 6.2 दशलक्ष डाऊनलोड्ससह जगातील दुसर्‍या क्रमांकाचं डाऊनलोड केलेलं  अ‍ॅप बनलं आहे. हे सर्वाधिक चीन आणि अमेरिकेत डाऊनलोड केले गेले आहे. यानंतर डाऊनलोड अ‍ॅप्सच्या यादीतील तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सिग्नल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमवारीत होते.

'लडाख संदर्भात चीन सोबत चर्चा हवी' 

टॉप 10 स्थापित अ‍ॅप्सबद्दल जाणून घ्या

सेन्सॉर टॉवर्सच्या यादीमध्ये इंस्टाग्राम सहाव्या क्रमांकावर आहे. सातवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूम होता. त्याचबरोबर, आठव्या क्रमांकावर एमएक्स टाकाटक, नवव्या क्रमांकावर स्नॅपचॅट आणि दहाव्या क्रमांकावर फेसबुक मेसेंजर आहे.  Google Play Store वर देखील टेलीग्रामला सर्वाधिक डाऊनलोड्स प्राप्त झाले आहेत. त्याच वेळी, आपण Apple Store स्टोअरचा विचार केला तर, आयओएस वापरकर्त्यांनी सर्वात टिकटॉक डाऊनलोड केले आहे.

मीना हॅरिस यांची संतप्त प्रतिक्रिया

संबंधित बातम्या