#NotMyKing ट्विटरवर ट्रेंडिंग, ब्रिटनच्या संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्यांना हवं तरी काय?

राणी एलिझाबेथ यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांनी राजपदाची शपथ घेतल्यानंतर ट्विटरवर '#NotMyKing' हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे
Prince Charles
Prince Charles Dainik Gomantak

ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर किंग चार्ल्स तृतिय (Prince Charles) यांच्या राज्याभिषेकाबाबत काहीशा चिंता वाढू लागल्या आहेत. राजेशाही विरोधी आंदोलकांचा गट या प्रसंगी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. या लोकांवर कारवाई करण्यासाठी सुरुवातीला पोलिसांनी खूप कडकपणा घेतला. पण सध्या हे लोक ब्रिटीश संसदेबाहेर शांततेने आंदोलन करत आहेत.

Prince Charles
Queen Elizabeth II यांचे पार्थिव बालमोरल येथून एडिनबर्गला रवाना

अल जझीरामधील वृत्तानुसार, या गटाच्या सदस्यांनी राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर राजा चार्ल्स III च्या शपथविधी विरोधात सार्वजनिकपणे आव्हान दिले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये ज्या लोकांना राजेशाहीचा अंत पाहायचा आहे, ते अल्पसंख्याक आहेत. YouGov च्या सर्वेक्षणानुसार, 22 टक्के लोकांना निवडून आलेला राष्ट्रप्रमुख हवा आहे. त्याच वेळी, 66 टक्के लोकांना राजघराण्यातील राष्ट्रप्रमुख पाहायचा आहे. YouGov सर्वेक्षणात असे दिसून आले की 44 टक्के ब्रिटन नागरिक राणीचे निधन झाल्याचे कळल्यावर रडले.

Prince Charles
Queen Elizabeth II: राणीचे पार्थिव स्कॉटलंडमध्ये दाखल, या दिवशी होणार अंत्यसंस्कार

या आठवड्यात, राणी एलिझाबेथ यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांनी राजपदाची शपथ घेतल्यानंतर ट्विटरवर '#NotMyKing' हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. हे आंदोलन केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिलेले नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये, राणीच्या मृत्यूच्या स्मरणार्थ देशभरात आयोजित केलेल्या काही कार्यक्रमांमध्ये लोक राजेशाही विरोधी चिन्हे बाळगताना, घोषणाबाजी करताना दिसले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com