आता कारमध्येही रोखता योणार कोरोनाचा प्रसार

PTI
सोमवार, 7 डिसेंबर 2020

कारमधील हवेचा प्रवाह आणि प्रकाशझोत नियंत्रित केल्यास प्रवाशांमधील कोरोनाचा प्रसार रोखता येणे शक्‍य असल्याचे संगणकीय सिम्युलेशनच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. यासंबंधीचे संशोधन ‘जर्नल सायन्स ॲडव्हान्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. 

बोस्टन  :  कारमधील हवेचा प्रवाह आणि प्रकाशझोत नियंत्रित केल्यास प्रवाशांमधील कोरोनाचा प्रसार रोखता येणे शक्‍य असल्याचे संगणकीय सिम्युलेशनच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. यासंबंधीचे संशोधन ‘जर्नल सायन्स ॲडव्हान्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. 

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गाडीच्या खिडक्‍या उघड्या किंवा बंद ठेवण्याची एक प्रणाली विकसित केली आहे. यातून चालक आणि एका प्रवाशामधील हवेद्वारे होणार संसर्ग टाळता येणे शक्‍य असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संशोधक डॉ. असुमांशु दास म्हणतात, ‘‘ गाडीचा एसी चालू ठेवून सर्व खिडक्‍या उघडणे  शहाणपणा ठरणार नाही. तसेच सर्व खिडक्‍या बंद ठेवणेही योग्य नाही. अशा वेळी एकतर सर्व खिडक्‍या उघडाव्यात किंवा किमान दोन जरी उघड्या ठेवल्या तरी चालतील.’’ शास्त्रज्ञांची सर्व प्रकारचे पर्याय वापरून संगणकीय सिम्युलेशनच्या मदतीने ही प्रणाली विकसित केली आहे. ज्यामुळे काही प्रमाणात का होईना कोरोनाचा संसर्ग रोखता येईल. अर्थात मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब  करावाच लागेल.

 

"चालकाच्या विरुद्ध बाजूच्या खिडकीतून हवा आत येते आणि प्रवाशाच्या विरुद्ध बाजूने असलेल्या खिडकीतून बाहेर पडते. यामुळे हवा  खेळती राहते त्याचबरोबर प्रवासी आणि चालक यांच्यामधील संसर्गही रोखला जातो. यासाठी दोघांनीही मास्क लावणे गरजेचे आहे."
- प्रा. केनी ब्रुअर, शास्त्रज्ञ, ब्राऊन विद्यापीठ

 

काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला? 

  •   ही रचना फक्त एक प्रवासी, चालकांसाठी 
  •   प्रवाशाने मागे बसणे आवश्‍यक  
  •   चालकाने आणि प्रवाशाने त्याच्या विरुद्ध बाजूची खिडकी उघडी ठेवावी
  •   यामध्ये शारीरिक अंतरही राखले जाते आणि प्रसाराचा धोकाही कमी होतो
  •   चारही खिडक्‍या उघड्या ठेवल्यास थोड्या फार प्रमाणावर संसर्ग टाळता        येईल

 

अधिक वाचा :

सौर ऊर्जेच्या वापरात आणि औद्योगिक बदलांमध्ये भारताने घेतलेला पुढाकाराचे युएन कडून कौतुक

पॅरिसमध्ये सुरक्षा कायद्याविरुद्ध हजारो नागरिकांकडून अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरूद्ध निदर्शने 

संबंधित बातम्या