आता पाकिस्तानलाही भारतीय  कोरोना लसीची अपेक्षा 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

कोव्हॅक्सच्या माध्यमातून  जगभरातील  जागतिक  लोकसंख्येच्या  20%  लोकांना  कोरोनाची  मोफत लस  देण्यात  येणार  आहे. 

नवी दिल्ली: भारतात  निर्माण  करण्यात  आलेली  कोरोनाची  लस  भारताने  शेजारी  देश  असणाऱ्या   बांग्लादेशला  कोरोना  लसीचे  20  लाख  डोस  पाठवण्याची  तयारी  केली  असताना  चक्क  भारताशी  थेट  संवाद  साधत  किंवा  मित्र  देशांशी  संवाद  साधत  भारतात  निर्माण करण्यात  आलेली  कोरोना  लस   मिळवण्याचा  पाकिस्तान  प्रयत्न करत  आहे.

बांग्लादेशच्या  सरकारी  अधिकाऱ्यांनी  भारताच्या  सीरम  इन्स्टिटय़ूटमधून  'कोवीशिल्ड' लसीचे   20  लाख  डोस  भारतातून  आणण्यात  येणार  असल्याची  माहिती दिली. बांग्लादेशमधील  भारतीय  उच्चायुक्तांच्या  हस्ते  कोरोनाच्या  लसींचा  साठा बांग्लादेशमधील  अधिकाऱ्यांच्या  हाती  देण्यात  येणार आहेत.

पाकिस्तानने ऑक्सफर्ड  आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी लसीला  मान्यता  दिल्यानंतर  भारतात  तयार  करण्यात आलेली  लस  मिळवण्यासाठी  पाकिस्तानंने  हालचाली  सुरू  केल्या  आहेत. कोव्हॅक्सच्या माध्यमातून  जगभरातील  जागतिक  लोकसंख्येच्या  20%  लोकांना  कोरोनाची  मोफत लस  देण्यात  येणार  आहे. पाकिस्तानला  दुसऱ्या  तिमाहीत   कोव्हॅक्सच्या  माध्यमातून लसींचा  पुरवठा  केला  जाईल  अशी  अपेक्षा  आहे.

मात्र  पाकिस्तानमधील  उर्वरित  लोकसंख्येला  भारताच्या  सीरम  इन्स्टिटय़ूटने  बनवलेल्या 'कोवीशिल्ड'  लसीवर  अवलंबून  राहवं  लागणार  आहे, 'कोवीशिल्ड'  लसीची परिणामकारकता  90%  पर्यंत  असल्या  कारणाने  पाकिस्तानच्या  डीआरपीने  या  लसीची अधिकृत  नोंदणी  करत  तिच्या  वापराला  परवानगी  दिली  आहे .

संबंधित बातम्या