आता यूट्यूबला ही डोनाल्ड ट्रम्प नकोत 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

ट्रम्प यांनी यूट्यबवर अपलोड केलेला व्हिडिओ हा हिसेंला उत्तेजन देणारा असल्या कारणाने यूट्यबने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

वाशिंग्टन: अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या    कंपनीपैकी एक असणाऱ्या गुगलची मालकी हक्क असणाऱ्या यूट्यबने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे.ट्रम्प यांनी यूट्यबवर अपलोड केलेला व्हिडिओ हा हिसेंला उत्तेजन देणारा असल्या कारणाने यूट्यबने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रम्प यांना पुढील सात दिवसांसाठी नवीन माहिती असणारा व्हिडिओ अपलोड करता येणार नाही,असं कंपनीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.आता ट्रम्प यांना अध्यक्षपदावर असताना कोणत्याही प्रकारचा नवीन माहिती असणारा व्हिडिओ यूट्यबवर अपलोड करता येणार नाही. 20 जानेवारीला अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत.कैपिटॉल हिलवर हल्ला झाल्यानंतर ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतातून बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे.तसेच ट्रम्प यांच्यावर फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे.

संबंधित बातम्या