पोर्तुगालमध्ये जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाचा बुस्टर डोस

कोरोना लस (Corona Vaccine) सर्वात प्रथम ज्या लोकांची प्रतीकारशक्ती (Immunity) कमी आहे त्यांना देण्यात येणार आहे.
पोर्तुगालमध्ये जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाचा बुस्टर डोस
Older people in Portugal will receive a corona booster doseDainik Gomanatk

पोर्तुगालमध्ये (Portugal) पुढील आठवड्यापासून 65 वर्ष आणि यापेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देणार आहे. कोरोना लस (Corona Vaccine) सर्वात प्रथम ज्या लोकांची प्रतीकारशक्ती (Immunity) कमी आहे त्यांना देण्यात येणार आहे. यात 80 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांचा समावेश आहे.

दक्षिण युरोपीय राष्ट्र पोर्तुगाल हे जगातील काही देशांपैकी एक आहे जेथे कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक दर आहे. कोविड-19 लसीचा अतिरिक्त डोस गेल्या महिन्यात येथे 16 वर्षावरील कमकुवत लोकांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता सरकार कोविड-19 लस 65 वर्षावरील अधिक वय असणाऱ्या लोकांना लसीचा तिसरा बुस्ट डोस देणार आहे.

Older people in Portugal will receive a corona booster dose
तालिबान राजवटीत आता शिक्षणही 'अवैध', सरकारचा अजब कायदा

आरोग्य सचिव अँटोनियो सेल्स यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना लसीचा दूसरा डोस मिळाल्यानंतर केवळ सहा महीन्यांनी बुस्टर डोस दिले जाऊ शकतात. स्पेन आणि फ्रान्ससारख्या अनेक युरोपियन युनियन देशांनी देखील बुस्टर डोस सुरू केले आहेत. ते म्हणाले की, 11 ऑक्टोबरपासून कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस वयस्कर लोकांना दिला जाईल. ईएमए (युरोपियन मेडीसीन एजन्सी) ने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या लोकांना फायझर - बायोटेक किंवा मॉडर्ना लसीच्या तिसऱ्या डोसची शिफारस केली आहे. परंतु युरोपीय देश आपल्या लोकांना कोणती लस देतील हे ठरवण्यास स्वातंत्र आहेत.

Related Stories

No stories found.