Cyber Crime: एक कॉल ,काही मिनिट बोलणं..आणि मुलीच्या खात्यातून 30 लाख गायब

Cyber Crime: सायबर क्राईमचे प्रमाणसुद्धा तितक्याच प्रमाणात वाढले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हे गुन्हे केले जातात.
Cyber Crime
Cyber Crime Dainik Gomantak

Cyber Crime: तंत्रज्ञानाच्या या काळात संपू्र्ण जग डिजिटल बनले आहे.याबरोबरच मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार करण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. परंतु सायबर क्राईमचे प्रमाणसुद्धा तितक्याच प्रमाणात वाढले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हे गुन्हे केले जातात.

आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. 18 वर्षाची मुलगी ऑनलाईन फ्रॉडचा शिकार झाली आहे. काही सेंकदातच तिने लाखो रुपए गमावले आहेत. ही घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली असून मुलीचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईल वर NAB (National Australia Bank) बॅंकेचा मेसेज आला होता.

मेसेजमध्ये बॅंक( Bank ) पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असून मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर तिला फोन करण्याविषयी सूचना दिल्या होत्या. तिने गडबडीत त्या नंबरवर फोन केल्यानंतर तिने आपले बॅंक खात्याविषयी सगळी माहीती दिली जेणेकरुन तिच्या खात्यातील ३० लाख रुपए दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Cyber Crime
Avani Chaturvedi: परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी

दरम्यान, काही वेळानंतर तिला NAB ऐवजी कॉमनवेल्थ बॅंकेत पैसे ट्रान्सफर केल्याचा मेसेज आला . त्यानंतर ऑरोरा तिच्यासोबत धोका झाल्याची आणि तीस लाख रुपए गमावल्याची जाणीव झाली. भारता(India)तसुद्धा अशा अनेक घटना घडत असतात, शासन नागरिकांना सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com