कोरोनाला येऊन एक वर्ष पूर्ण..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला आढळल्याचे काही अहवाल सुचवितात. त्यानुसार, कोरोना विषाणूने जगभरात हात पाय पसरविण्यास सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.

वॉशिंग्टन  : चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला आढळल्याचे काही अहवाल सुचवितात. त्यानुसार, कोरोना विषाणूने जगभरात हात पाय पसरविण्यास सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. काही शास्त्रज्ञ वगळता एका वर्षभरापूर्वी ‘कोरोना’ किंवा ‘कोविड १९’ हे नावही माहित नसणाऱ्या जगातील साडे तेरा लाख जणांचा या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर दररोज किमान पाच नवे रुग्ण आढळत होते, असे काही अहवालांतून स्पष्ट होत आहे. याच काळात चीनमधील वृत्तपत्रांमध्ये ‘कोरोना’ हे नाव प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. आता जगातील कोरोनाबाधितांची संख्या साडे पाच कोटींहून अधिक झाली असून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आणि मृतांची संख्या साडे तेरा लाखांच्या जवळ गेल्याचे दिसत आहे. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू अमेरिकेत आहेत. 

संबंधित बातम्या