तैवानमध्ये घुसून चिनी अधिकाऱ्याची दडपशाही

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

राष्ट्रीय दिनी फिजीतील कार्यालयात चिनी अधिकाऱ्यांनी घुसखोरी केल्याचा आणि त्यांच्याशी मारामारी झाल्यामुळे तैवानच्या राजनैतिक अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

तैपेई : राष्ट्रीय दिनी फिजीतील कार्यालयात चिनी अधिकाऱ्यांनी घुसखोरी केल्याचा आणि त्यांच्याशी मारामारी झाल्यामुळे तैवानच्या राजनैतिक अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. आठ ऑक्टोबर रोजी तैवानने राष्ट्रीय दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास कोण उपस्थित आहेत याची माहिती आणि छायाचित्रे घेण्यासाठी चिनी अधिकारी स्वागत कक्षात जबरदस्तीने शिरले. तैवानच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्याच्या डोक्याला जखम झाली. अखेर फिजी पोलिसांनी चिनी अधिकाऱ्यांना बाहेर काढले. दरम्यान तैवानच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप चिनी अधिकाऱ्यांनी केला.

"चीनचे अधिकारी नेहमीच असे वर्तन करतात, की हा अपवादात्मक प्रसंग आहे, याबाबत आम्ही अजूनही माहिती घेत आहोत. त्यांच्या अशा अविवेकी कृत्याचा आम्ही निषेध करतो."
- हेन्री त्सेंग, तैवानचे उपपरराष्ट्र मंत्री

"फिजीचे कुणी नेते कार्यक्रमाला उपस्थित होते का याची माहिती घेण्याचा चीनच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता. त्या वेळी एकमेकांना ढकलणे आणि कोपराने मारण्याचा प्रकार घडला."
- लॅरी त्सेंग, पूर्व आशिया-पॅसिफिक खातेप्रमुख
 

संबंधित बातम्या